petrol thieves 
पश्चिम महाराष्ट्र

सर्वाधिक चोऱ्या पण कशाच्या ते वाचा... 

सकाळवृत्तसेवा


सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले असून संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळात लोकांना फिरता येत नाही. या काळात पेट्रोल चोरट्यांनी धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. 

जगभर पसरलेला कोरोनाचा संसर्ग सांगली जिल्ह्यात पसरू लागला आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून प्रशासनाकडून खबरदारी घेतली आहे. लॉकडाउन असल्याने सर्वत्र व्यवहारही बंद आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवेसाठी जाणाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या ओळखपत्रावरून त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जाते. अन्य लोकांना पेट्रोल दिले जात नाही. त्यामुळे तरूणाईकडून पेट्रोल चोरीचा नवा फंडा वापरला जात आहे. 

फ्लॉट पार्किंगमध्ये लावलेली दुचाकीतील पेट्रोल सहजपणे चोरता येत असल्याने सर्रास चोऱ्या होऊ लागल्या आहेत. यात महाविद्यालयीन तरुणांचा अधिक सहभाग दिसून आला आहे. तसेच हायस्पीड गाड्यात पेट्रोल अधिक लागते. यासाठी पेट्रोल चोरी करण्याचे नव फॅडही तरुणाईत आले आहे. याचा नाहक त्रास लोकांना होऊ लागला आहे. शहरातील अपार्टमेंटमधून दररोज एकाना एका गाडीतून पेट्रोल चोरी केली जात असल्याचे दिसते आहे. दुचाकीच्या पेट्रोलची पाईप काढल्यानंतर त्याठिकाणी बाटली लावून चोरटे सर्रास चोरी करत आहेत. 

लॉकडाउन काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. वाहने जप्त करण्यात येत असून ती वाहने लॉकडाउननंतर दिले जाणार आहे. शहरातील बसस्थानक परिसरातील विविध पोलिस ठाण्यात ही वाहने लावण्यात आली आहे. त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. मात्र, तेथूनही काही गाड्यातील पेट्रोल चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT