The mother also committed suicide after throwing two daughters in the pool after a dispute with her husband belgum marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

पोटच्या मुलींना तळ्यात फेकून मातेने ही घेतली तळ्यात उडी...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर दोन मुलींना तळ्यात फेकून मातेनेही आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी हनमापूर (ता. रामदुर्ग) येथे घडली. लक्ष्मी कल्लोळेप्पा वड्डर (वय ३०, रा. हनमापूर) असे मातेचे नाव असून, कीर्ती (वय १०) आणि श्रावणी (वय ३) अशी मुलींची 
नावे आहेत. 

या प्रकरणी रामदुर्ग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, लक्ष्मी ही मंगळवारी (ता. ७) यात्रेनिमित्त माहेरी जाणार असल्याचे पतीला सांगत होती. मात्र, पती कल्लोळेप्पाने तिला माहेरी जाण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे त्याच दिवशी दोन्ही मुलींना सोबत घेऊन माहेरी जात असल्याचे सांगत रागाच्याभरात निघून गेली होती. 

तिघांचेही मृतदेह तरंगताना आले निदर्शनास

गुरुवारी पतीने पत्नीच्या माहेरी चौकशी केली असता, ती तिकडे पोहचली नसल्याचे सांगण्यात आले. त्याच हनमापूर येथील तळ्यात गुरुवारी सकाळी तिघांचेही मृतदेह तरंगताना काहींच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. काही वेळानंतर रामदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचमाना केला. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणी केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT