पश्चिम महाराष्ट्र

अंड्याच्या पोळीसाठी त्याने फोडली आईच्या डोक्यात बाटली

सकाळवृत्तसेवा

मिरज : अंड्याची पोळी करून दिली नसल्याच्या कारणावरून मुलाने आपल्या आईवरच काचेच्या बाटलीने हल्ला केला.

ही घटना तालुक्‍यातील खंडेराजुरी येथे घडली. आई जखमी झाली आहे. अरुणा गोपीनाथ घनसरे (वय 64) असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगा शशांक गोपिनाथ घनसरे (वय 21) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. 

खंडेराजुरी येथील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या अरुणा घनसरे यांचा मुलगा शशांक हा व्यसनी आहे. तो मद्यपान करून घरी आला होता. त्याने आईला अंड्याची पोळी करून मागितली. मद्यपी मुलाकडून हा वारंवार त्रास होत असल्याने वैतागलेल्या आईने अंड्याची पोळी करून देण्यास नकार दिला. त्यावेळी मुलगा शशांक आणि आई अरुणा यांच्या बरीच वादावादी झाली.

त्या वादावादीतून शशांकने घरातील काचेची बाटली आईच्या डोक्‍यात घातली. त्यत्त अरुणा घनसरे या जखमी झाल्या आहेत. त्यांनी मुलगा शशांक विरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT