Mother-in-law hard labor with husband who incites married woman to commit suicide 
पश्चिम महाराष्ट्र

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासूस सक्तमजुरी

शैलेश पेटकर

सांगली ः वारंवार छळ करून सात महिन्यांच्या गरोदर विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासूला जिल्हा न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अंकुश दगडू साळुंखे (वय 32) व शालन दगडू साळुंखे (वय 50, दोघेही रा. आवळाई) असे शिक्षा झालेल्या माय-लेकांची नावे आहेत. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आरती देशपांडे साटविलकर यांनी काम पाहिले. 


खटल्याची माहिती अशी की, आरोपी अंकुश व मयत ज्योती यांचे 2011 मध्ये लग्न झाले होते. पहिले वर्ष पती व सासूने ज्योतीला व्यवस्थित सांभाळले. मात्र तिला मुलगा झाल्यानंतर बारशामध्ये मानपान केला नाही म्हणून ज्योतीला दोघांनी त्रास द्यायला सुरुवात केली. दोन तोळे व टेंपोसाठी चार लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. याबाबत ज्योतीने आपल्या माहेरी सांगितले होते. त्यानंतर ज्योतीच्या वडिलांनी एक तोळ्याचा नेकलेस व अंगठी दिली, तरीही तिचा छळ सुरूच होता. त्यामुळे 2014 मध्ये ज्योतीने आटपाडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 


तक्रारीनंतर आरोपी ज्योतीच्या माहेरी आले व त्यांनी आम्ही त्रास देणार नाही, नीट सांभाळतो म्हणत तिला सासरी घेऊन आले. मात्र, पुन्हा छळ सुरूच होता. 2015 मध्ये तिच्या वडिलांसमोरच तिला मारहाण करण्यात आली. यावेळी ज्योती सात महिन्यांची गरोदर होती. यावेळी तिच्या वडिलांनी तिला माहेरी येण्यास सांगितले.

मात्र, मुलाचा विचार करून ती गेली नाही. 25 फेब्रुवारी 2015 रोजी तिने विष पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या वडिलांनी आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. इसाक चौगुले यांनी तपास केला. न्यायालयासमोर चार साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी कक्षातील उपनिरीक्षक शरद राडे, गणेश वाघ, वंदना पवार, रमा डांगे यांनी सरकारपक्षाला मदत केली. 


दंडाची रक्कम मुलाला मिळणार 
ज्योतीच्या मृत्यूनंतर तिच्या पहिल्या मुलाचा वडिलांनी सांभाळ केला आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी सांभाळ केल्याने आरोपींना झालेली दंडाची दीड लाख रुपयांची रक्कम फिर्यादींना काढून घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली. ही रक्कम मुलाच्या नावावर मुदत ठेव ठेवून तो सज्ञान होईपर्यंत त्याचा वापर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत. न्यायालयासमोर चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सिद्ध झाल्याने आरोपींना दोषी धरत दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Injury Updates: मुंबई इंडियन्ससह ८ संघांना बसलाय दुखापतीचा फटका; आतापर्यंत १४ खेळाडूंनी वाढवली फ्रँचायझींची डोकेदुखी

मिरा-भाईंदरमध्ये नवे वाहनतळ उभारणार, वाहतूक कोंडी कायमची फुटणार; पालिकेचा मोठा निर्णय

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड शहरातील डी. वाय. पाटील रुग्णालयातून ५.२२ लाखांची इंजेक्शने लंपास

Sugar industry: राज्यातील साखर उद्योग सापडला आर्थिक कोंडीत; अनुदानाची टांगती तलवार, ३०० कोटींचा ‘ट्रेझरी’ प्लॅन!

SCROLL FOR NEXT