Arbhak 
पश्चिम महाराष्ट्र

पंढरपुरात काय घडला धक्कादायक प्रकार? वाचा

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : आपल्या दोन महिन्याच्या स्त्री जातीच्या अर्भकाल सोडून निष्ठुर झालेली आई परागंधा झाल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात समोर आला आहे. "माता न तू वैरी" अशीच घटना या अर्भकाच्या बाबतीत घडली आहे.
पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण मंदिरा जवळ शुक्रवारी (ता. १०) अनोळखी स्त्री आपल्या दोन महिन्याच्या स्त्री जातीच्या अर्भकाला घेऊन बराच वेळ बसली होती. मात्र तिच्या मनात वेगळचं काही तरी सुरू होतं. बराच वेळ बसल्यानंतर कठोर झालेल्या या महिलेने जवळच असलेल्या एका दुकानदाराकडे आपल तान्हुलं बाळ सोपवून लघुशंका करून येते, अशी बतावणी केली. दुकानदार सचिन व्यवहारे यांनी त्या अनोळखी महिलेची बराच वेळ वाट पाहिली. परंतु ती महिला बाळ सोडून गेल्याचे लक्षात आल्यानंतर मनोज वाडेकर, धैर्यशील काळे यांनी याबाबत पोलिसांना माहिती देवून बाळ महिला पोलिस प्रियंका मोहिते, सोनाली इंगोले आणि पोर्णिमा हादगे यांच्याकडे सुर्फूत केले.
सकाळपासून भुकेने आणि आईच्या मायाने व्याकुळ झालेल्या बाळाला या महिला पोलिसांनी मायेची उब दिली. त्यानंतर बाळाच्या चेहऱ्यावर कुठे हास्येची लखेर उमटल्याचे पाहायला मिळाले. सर्व शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर या बाळाला येथील नवरंगे बालकाश्रमात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात महिले विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: चक्रीवादळ अर्नबमुळे विदर्भात पावसाची शक्यता; दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळणार?

Mercedes Accident १७ वर्षांच्या मुलाची जामिनावर सुटका, आता न्यायाधीश वडिलांवर गुन्हा दाखल करण्यास हायकोर्टाची परवानगी

Belagavi To Kolhapur Railway Route Survey : बहुप्रतिक्षित बेळगाव-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरू; पुण्यातील कंपनीकडे सर्वेक्षणाची जबाबदारी, 55 लाखांचा निधी मंजूर

Maharashtra Live News : मनोज जरांगेंच्या कथित ऑडिओप्रकरणी एसआयटी स्थापन होणार

Diwali Market: रंगीत, तरंगणाऱ्या पणत्यांचे आकर्षण;दिवाळीची लगबग सुरू; ग्राहकांच्या प्रतिसादाकडे व्यापारीवर्गाचे लक्ष

SCROLL FOR NEXT