mother name on name plate of govt officials sangli  Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : अधिकाऱ्यांच्या पाटीवर झळकले आईचे नाव

पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सुरवात

सकाळ वृत्तसेवा

सांगली : राज्य शासनाने शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक केले आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून सुरू झाली आहे. त्यानुसार शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या पाटीवर त्यांच्या आईचे नाव हे झळकू लागले आहे.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी निवास, कार्यालयाबाहेर लावलेल्या पाटीवर आईच्या नावाचाही उल्लेख केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने ११ मार्च २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाप्रमाणेच आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला.

त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून करण्याचे ठरले. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार सर्व कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतनचिठ्ठी, सेवापुस्तिका, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने आदी शासकीय दस्तऐवजात आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यास मान्यता दिली आहे.

बालकांच्या नावाबाबत सूचना नाहीत

या निर्णयानुसार १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंदणी करताना वडिलांच्या आधी आईचे नाव लावले जाणार आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला जन्म-मृत्यू नोंदवहीत सुधारणा करावी लागणार आहे.

शासनाकडून अद्याप कोणतेही परिपत्रक आलेले नाही. ते आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना याबाबतची सूचना दिली जाणार आहे.

त्यानंतर रुग्णालयाकडून नवजात बालकाची जन्म नोंद करताना आईच्या नावासह जन्म-मृत्यू विभागाला माहिती दिली जाणार आहे. कागदपत्रांवर आधी बालकाचे नाव, त्यानंतर आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव याप्रमाणे लावण्यात येईल.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून सुरवात

निर्णयाची अमंलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून केली आहे. त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या पाटीवर आईचे नाव लावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT