Raibag Police Case esakal
पश्चिम महाराष्ट्र

दोन चिमुरड्या मुलांसह आईने विहिरीत उडी मारुन संपवलं जीवन; आधी दोन्ही मुलांना विहिरीत ढकललं अन्..

Raibag Police case : बोमनाळ येथे अर्जुन करीहोळे हे पत्नी व मुलांसह राहतात. शनिवारी पती आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले.

सकाळ डिजिटल टीम

नातेवाइकांनी तीनही मृतदेह पाहून हंबरडा फोडला. सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

रायबाग : घरगुती भांडणातून महिलेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. २९) सकाळी बोमनाळ (ता. रायबाग) येथे उघडकीस आली. यल्लव्वा अर्जुन करीहोळे (वय ३०), सातव्वा उर्फ स्वाती (वय ५), मुत्ताप्पा उर्फ सात्विक (दीड वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून (Raibag Police) मिळालेली माहिती अशी, बोमनाळ येथे अर्जुन करीहोळे हे पत्नी व मुलांसह राहतात. शनिवारी पती आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात यल्लवा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घरातून बाहेर पडली. गावातील एका जुन्या विहिरीत दोन्ही मुलांना तिने पहिल्यांदा ढकलून दिले. त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. बराचवेळ झाला तरी यलव्वा हिचा कोठे थांगपत्ता लागत नव्हता. अखेर गावातील एका विहिरीजवळ शोध घेतल्यानंतर त्या ठिकाणी यल्लव्वा आणि तिची मुले दिसून आली.

घटनास्थळी पोलिस तातडीने दाखल झाले. ग्रामस्थ व अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने तिघांनाही बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी पाठविले. मात्र, त्यापूर्वी तिघांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. रविवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर यावेळी गावातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नातेवाइकांनी तीनही मृतदेह पाहून हंबरडा फोडला. सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी संबंधित पोलिसांना तातडीने बचावकार्य करतानाच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. रायबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. एस. मंटूर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून, त्यानुसार पती अर्जुन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : झारखंडमध्ये JPSC-JSSC विद्यार्थ्यांच्या 'विधानसभा घेराव' मोर्चात पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलक विद्यार्थी आक्रमक

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT