पश्चिम महाराष्ट्र

Mothers Day : गतिमंद मुलाच्या सक्षमतेसाठी मातेची धडपड

बलराज पवार

सांगली - शहरातील कुठल्याही भागातील साप्ताहिक बाजारपेठेत एक मुलगा काही वस्तू विकण्यासाठी बसलेला दिसतो. दहा रुपयांपासून तीस रुपयांपर्यंतच्या वस्तू असतात. वस्तूंचा रंग ओळखून, त्यावरील किंमत वाचून तो गिऱ्हाईकाकडून पैसे घेतो.  मात्र तो गतिमंद आहे, असे म्हटल्यावर विश्‍वास बसत नाही. त्याच्या आईची ही धडपड सुरू आहे, त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्याची.

ओंकार सुरेश रेळेकर.. वय २९ वर्षे.. बुद्‌ध्यांक ६५... एवढी माहिती त्याच्याबद्दल पुरेशी आहे. मात्र खरी किमया आहे ती त्याची आई संध्या रेळेकर यांची. सध्या सांगली सिव्हिलमध्ये सहायक मेट्रन पदावर त्या काम करतात. त्याचवेळी गतिमंद असलेल्या ओंकारला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. 

ओंकारचे वडील सुरेश यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. तशी घरची आर्थिकस्थिती चांगली आहे. मात्र तरीही मुलगा गतिमंद आहे म्हणून त्याला परावलंबी ठेवण्याची त्यांची इच्छा नाही. तो स्वत:चा व्यवसाय करावा, त्याला व्यवहार समजावा, हिशेब कळावा यासाठी आई संध्या प्रयत्न करीत आहेत.

‘ओंकार सहा महिन्यांचा असताना तो इतरांसारखा नॉर्मल नाही हे लक्षात आले. सुरवातीस मला त्याच्याकडे पाहून वाईट वाटत असे. त्याला घाटकोपर येथील डॉक्‍टर गांधी यांच्याकडे दाखवले. त्यांनी सुरवातीसच ठणकावून सांगितले की, ओंकार मतिमंद आहे हे विसरायचे. त्याच्याकडे सामान्य मुलांसारखेच पहायचे. तेव्हापासून  मी ओंकारला मतिमंद, गतिमंद असे समजत नाही. आज तोच माझे आयुष्य बनला आहे, असे संध्या रेळेकर सांगतात. 

त्या म्हणाल्या,‘‘ओंकारला शिक्षण द्यायचे ठरवले. नवजीवन मतिमंद मुलांच्या शाळेत तसेच मिरजेतील शाळेत त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्याला ग्रॅज्युएट करण्याची इच्छा होती. मात्र माझ्या बदलीमुळे ते झाले नाही. सांगलीत आल्यानंतर त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्याच्याशी बोलले, तुला नोकरी करायची आहे की दुकान सांभाळणार? यावर त्यानेच नोकरी करणार नाही असे सांगितले. त्यामुळे गेली काही वर्षे त्याला काही वस्तू घेऊन देऊन बाजारात बसवतो. त्याला, वस्तू कोणत्या, त्यांची किंमत, रुपये, पैसे कसे असतात हे सगळे शिकवले. खरेदी कशी करायची आणि कसे विकायचे हेही तो आता शिकला आहे. त्याच्यासोबत मीही जाते. मात्र मी लांबच थांबते. त्याचा तो व्यवहार करतो. घरगुती लागणाऱ्या दहा रुपयांपासून ते तीस रुपयांपर्यंतच्या वस्तू असतात. काही वेळा कॅल्क्‍युलेटरवर हिशेब करतो. त्याची आकलनशक्ती तुलनेने चांगली आहे.’

ओंकारला असे बाजारात वस्तू विकण्यासाठी  बसवल्यावर, लोक काय म्हणतील, याच्या अपेक्षितच प्रतिक्रिया आल्या. काय गरज आहे? काय कमी आहे? पण त्याकडे लक्ष दिले नाही. आपल्या मुलास सक्षम  करणे हीच खूणगाठ मनाशी बांधून ठामपणे त्याच्या पाठीशी राहिले, असे संध्या रेळेकर सांगतात. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT