Bike Thieves Arrested Sakal
पश्चिम महाराष्ट्र

अट्टल मोटारसायकल चोरटा जाळ्यात

पलूस पोलिसांची कारवाई : दोन लाख रुपये किंमतीच्या पाच मोटारसायकली जप्त

सकाळ वृत्तसेवा

पलूस - सूर्यजित विलास माने (वय २७ , रा. आंधळी, ता. पलूस) या अट्टल मोटारसायकल चोरट्यास दोन लाख रुपये किमतीच्या पाच मोटारसायकलीसह पलूस पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याकडून पलूस आणि तासगाव पोलिस ठाणे हद्दीतील ९ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पलूस पोलिसांना यश आले आहे.

एक महिन्यापूर्वी आंधळी रोड, पलूस येथून अनोळखी चोरट्याने एक मोटारसायकल चोरल्याप्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. पोलिस नाईक राकेश भोपळे या प्रकरणाचा तपास करत होते. अखेर भोपळे यांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पलूस पोलिसांच्या पथकाने सापळा रचून सूर्यजित माने याला ताब्यात घेतले. मानेची कसून चौकशी केली असता, त्याने पलूस पोलिस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्यास अटक करण्यात आली.

या चोरट्याकडून पलूस पोलिस ठाण्यात दाखल असलेले ८ गुन्हे; तसेच तासगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेला १ असे ९ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यामध्ये या चोरट्याकडून पलूस पोलिस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील एफ डीलक्स मोटार सायकल, एम. डिलक्स, पॅशन प्रो मोटारसायकल, होन्डा युनिकॉर्न, टी. व्ही. एस. एक्सल; तसेच तासगाव पोलिस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील स्प्लेंडर मोटारसायकल अशा पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

ही कारवाई पोलिस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस ठाण्याचे सहायक निरीक्षक विकास जाधव, पोलिस नाईक राकेश भोपळे, दिलीप गोरे, प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल प्रमोद साखरपे, अमोल कदम, हेडकॉन्स्टेबल रमेश किरपेकर, पोलिस नाईक नवनाथ धनवडे, गिरीश मोरे, सांगली सायबर क्राईमचे कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे. या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पलूस पोलिसांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : दिल्ली येथे २०९ किलो वजन असलेल्या 'सुपर-सुपर ओबेसिटी'च्या रुग्णावर यशस्वी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT