अपघातात मोटार सायकल डंपरच्या खाली sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेनाडीजवळील अपघातात मोटार सायकलस्वार ठार

दोघे गंभीर : डंपरची धडक, मृत भुदरगड तालुक्यातील

अमोल नागराळे

निपाणी : आडी-बेनाडी मार्गावर झालेल्या मोटार सायकल व डंपर अपघातात मोटार सायकलस्वार ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २२) दुपारी घडली. संभाजी ज्योती माने (वय ५५, रा. मडीलगे, ता. भुदरगड) असे मृताचे तर श्रुती बबन माने (वय ३८, रा. मडीलगे) व अविज्ञ माने (वय ३) असे गंभीर जखमींची नावे आहेत. घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिस स्थानकात झाली आहे.

याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संभाजी माने हे श्रुती व अविज्ञ हिला आणण्यासाठी शिवापूरवाडी (ता. निपाणी) येथे गेले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शिवापूरवाडीहून मोटार सायकलीने (एमएच-०७-ई-६२७६) परतताना आडी-बेनाडी मार्गावर हंचिनाळ क्राॅसनजिक समोरून येणारया डंपर (केए-२२-ए-७४००)ची धडक मोटार सायकलीला बसली. मोटार सायकल डंपरखाली डाउन अडकली. त्यात मोटार सायकलवरील संभाजी माने, श्रुती व अविज्ञ यांना डोकीला व विविध ठिकाणी गंभीर दुखापत झाली.

जखमींना तातडीने महात्मा गांधी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वाटेतच संभाजी माने यांचा मृत्यू झाला. श्रुती व अविज्ञ यांच्यावर गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी वाहनदारकांसह लोकांनी गर्दी केली होती. निपाणी ग्रामीण पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT