MP Annasaheb Jolle esakal
पश्चिम महाराष्ट्र

नेता असावा तर असा! निवडणुकीच्या खर्चाची रक्कम शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देणार; भाजप खासदाराची मोठी घोषणा

'शेतकरी हित समोर ठेवून कारखाना चालविला तर काय होते, याची प्रचिती आली आहे.'

सकाळ डिजिटल टीम

एकवेळ हालसिद्धनाथ साखर कारखाना काय होता आणि सध्या कशा पध्दतीने कामकाज सुरू आहे याची सभासदांना खात्री पटली आहे.

निपाणी : श्री हालसिद्धनाथ सहकारी (मल्टिस्टेट) साखर कारखान्याची (Halsiddhanath Sugar Factory Election) पंचवार्षिक निवडणूक कारखान्याच्या इतिहासात सर्वांच्या सहकार्याने बिनविरोध होत आहे. निवडणूक प्रशासनाकडून केवळ घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचे खासदार अण्णासाहेब जोल्ले (Annasaheb Jolle) यांनी सांगितले.

या निवडणुकीच्या खर्चाची रक्कम कारखान्याचे सभासद, शेतकरी पाल्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला जाणार असल्याची घोषणाही कारखान्याचे मार्गदर्शक व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केली.

जोल्ले म्हणाले, 'एकवेळ हालसिद्धनाथ साखर कारखाना काय होता आणि सध्या कशा पध्दतीने कामकाज सुरू आहे याची सभासदांना खात्री पटली आहे. शेतकरी हित समोर ठेवून कारखाना चालविला तर काय होते, याची प्रचिती आली आहे. निवडणूक बिनविरोधसाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सभासद, हितचिंतकांना धन्यवाद देतो. कारखान्यात अनेक विकासकामे सुरु आहेत. निवडणूक आमदार बिनविरोध झाल्याने कारखान्याला उज्वल भवितव्य मिळवून दिले जाईल.'

शशिकला जोल्ले म्हणाल्या, खासदार जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम. पी. पाटील व संचालकांनी मागील पाच वर्षात कारखान्याला उर्जितावस्था आणली. कामाची पोचपावती यानिमित्ताने मिळाली आहे. बंद पडण्याच्या स्थितीत आलेल्या कारखान्याचा दूरदृष्टीतून केवळ पाच वर्षात विकास झाला आहे.

राज्यात आदर्श कारखाना बनवू. यावेळी चंद्रकांत कोठीवाले, पप्पू पाटील, पवन पाटील, बंडा घोरपडे, अनिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी एम. पी. पाटील, आप्पासाहेब जोल्ले, अविनाश पाटील, समीत सासणे, प्रकाश शिंदे, विश्वनाथ कमते, सुकुमार पाटील (बुदिहाळकर), जयवंत भाटले, प्रणव मानवी, राजू गुंदेशा, अमित रणदिवे, सिध्दू नराटे, बाळासाहेब जोरापुरे यांच्यासह अर्जधारक, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: RCB च्या नव्या शिलेदाराचं खणखणीत शतक, तर वैभव सूर्यवंशीची फिफ्टी; भारताला उभारला धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : उत्तर महाराष्ट्रात ६ फेब्रुवारीला ठरणार महापौर

'असली भांडणं कुठून शिकतेस?' शशांक केतकरने बायकोला विचारला प्रश्न, प्रियंकानं बिग बॉसचा शो दाखवत केलं असं काही की... viral video

Video: मिरा-भाईंदरमध्ये बांधला १०० कोटींचा 'विचित्र' पुल! ट्रोल झाल्यावर MMRDA चं स्पष्टीकरण; मनसेनं इंजिनिअर्सना दिला 'वस्तरा'

T20 World Cup खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला, तर निघू शकतात दिवाळे; जाणून घ्या काय होऊ शकतात परिणाम

SCROLL FOR NEXT