पश्चिम महाराष्ट्र

सदाभाऊं खोतांच्या आयत्या पिठावर रेघोट्या

सकाळवृत्तसेवा

जयसिंगपूर - ‘ज्येष्ठांनी प्रयत्न केल्याने स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा संभाजीपूरला मिळाला, माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील, जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संजय मंडलिक आणि सावकर-मादनाईक यांच्या प्रयत्नातून संभाजीपूरला नवीन पेयजल योजना मंजूर झाली. ‘आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारे सदाभाऊ खोत संभाजीपूर कुठे आहे? असा सवाल ते विचारतात. त्यामुळे ते येथे आल्यानंतर त्यांनी जाहीर केलेले पंचवीस लाख त्यांच्याकडून घ्यावेत, असे प्रतिपादन, खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. 

संभाजीपूर (ता.शिरोळ) येथे ४ कोटी ९४ लाखांच्या पेयजल योजनेचे उद्‌घाटन आज सायंकाळी झाले. यावेळी ते बोलत होते. सरपंच अनुराधा कोळी यांनी स्वागत केले. 

खासदार शेट्टी म्हणाले, ‘संभाजीपूर ग्रामस्थांनी सदाभाऊ खोत मंत्री झाल्यानंतर मिरवणूक काढली होती.  नूतन गावच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी जाहीर केला होता. मात्र, त्याची आठवण त्यांना नाही. भूलथापा मारणाऱ्यांना जनता धडा शिकवेल.’

शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, सा. रे. पाटील, सावकर मादनाईक यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यानेच संभाजीपूरला पेयजल योजना मंजूर झाली आहे. जयसिंगपूरचा संभाजीपूर हा छोटा भाऊ असून, जॅकवेलसह अन्य सुविधा जयसिंगपूरने उपलब्ध करुन दिली आहे.

सावकार मदनाईक म्हणाले, ‘शासकीय उदघाटन करणाऱ्यांनी योजनेसाठी काय केले ते जाहीर करावे. जाहीर केलेले पैसे गेले कुठे? असा सवालही त्यांनी केला.’ 

यावेळी जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, पंचायत समिती सदस्य मन्सूर मुल्लाणी, नगरसेवक युनूस डांगे, शैलेश चौगुले, राहुल बंडगर, प्रेमला मुरगूंडे, संभाजी मोरे, अनुराधा आडके, ऋतुराज सावंत-देसाई, संभाजी कोळी, डॉ. महावीर अक्कोळे, पूजा कोळी, ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे आदी होते. उपसरपंच बरकत गवंडी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT