पश्चिम महाराष्ट्र

 उरमोडी योजनेचे पाणी राजेवाडी तलावात सोडा - खासदार संजयकाका पाटील

गणेश जाधव

दिघंची - आटपाडी व सांगोला तालुक्यामध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे. राजेवाडी डाव्या कालव्यावर दोन्ही तालुक्यातील शेती अवलंबून आहे. यासाठी किमान एक पाळी शेतकऱ्यांना पुरेल एवढे पाणी मिळावे. तसेच उरमोडी सिंचन योजनेचे पाणी राजेवाडी तलावात किमान दोन महिने सोडा असा आदेश  कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी  उरमोडीच्या अधिकाऱ्यांना दिले.

उरमोडी सिंचन योजनेच्या पाण्याचा प्रवाह राजेवाडी तलावाच्या दिशेने सुरु झाला असून ते पाणी म्हसवडपर्यंत येवुन पोहचले आहे. या पाण्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी म्हसवड येथील गेस्ट हाऊसवर आढावा बैठक जेष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख व अधीक्षक अभियंता हनमंत गुनाले, राजेवाडी तलाव पाणी संघर्ष समिती व शेतकरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

खासदार पाटील म्हणाले गेल्या दोन महिन्यापूर्वी मी दिघंची येथील झालेल्या बैठकीत सांगोला व आटपाडी येथील शेतकऱ्यांना राजेवाडी तलावामध्ये कोणत्याची परिस्थितीत पाणी आणणार असा शब्द दिला होता व त्याची पूर्तता होत असुन सध्या म्हसवडपर्यत असणारे उरमोडीचे पाणी दहा दिवसात राजेवाडीत दाखल होणार आहे. यासाठी मी व जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला व त्यांनी आम्हाला मदत केली.

दृष्टिक्षेपात  

  • उरमोडी  पाणी : * १५ दिवसात  
  • उरमोडी पाण्याचा प्रवास म्हसवडपर्यंत  
  • * १० दिवसात राजेवाडी तलावात
  • * राणी व्हिक्टोरियाने बांधलेला तलाव
  • क्षमता - दीड टीएमसी
  • पाण्याचा वेग ५०  क़ुसेस
  •  ४ लाख वीजबिल खर्च
  •  रोज ४ एमसीएफटी पाणी साठा  
  • दोन महिन्यात  २५० एमसीएफटी पाणी साठा
  • उरमोडी सिंचन योजना प्रवाहात नदीवरील १९ बंधारे
  • टॅकरपेक्षा हा खर्च परवडणारा 

सिंचन योजनेच्या १९ /८१  पॅटर्नप्रमाणे चार लाखापैकी रोज एक लाख याप्रमाणे दोन महिण्याचे ६० लाख रुपये आटपाडी व सांगोला तालुक्यामधील शेतकरी भरतील पण आम्हाला पुर्णक्षतेने पाणी द्या.

- आमदार गणपतराव देशमुख.

प्रथमच ऐतिहासिक राजेवाडी तलावामध्ये बाहेरील उरमोडी सिंचन योजनेचे पाणी येत अाहे. आम्ही सातत्याने खासदार संजयकाका पाटील यांचेकडे केलेल्या पाठपुराव्याने यश आले.

- अमरसिंह देशमुख, माजी.जि.प.अध्यक्ष 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT