Udyanraje Bhosale
Udyanraje Bhosale 
पश्चिम महाराष्ट्र

आता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना दिला.

जलमंदिर पॅलेस येथे आज (सोमवार) खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्तिथ सातारा विकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका तसेच विविध ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

बैठकीत सध्या सुरु असलेली विविध विकासकामे, प्रलंबित कामे तसेच आगामी काळात करण्यात येणाऱ्या कामाबाबत चर्चा झाली. त्यांनतर युवा कार्यकर्त्यांनी प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही विजयादशमी दिवशी सिमोल्लंघन मोठ्या दणक्यात साजरे करण्याचा आग्रह उदयनराजेंकडे केला. गावागावातून मोठ्या संख्येने लोक यावेत असे कार्यक्रम ठेवायला पाहिजेत अशी हि भावना व्यक्त केली.

उदयनराजेंनी स्मितहास्य करून अहो दरवर्षी मी असतोच तुम्ही या म्हणजे झाले, नाहीतर आमचाच कार्यक्रम कराल अशी टिप्पणी केली.त्यावेळी बैठक हॉल धीर गंभीर झाला.
उदयनराजे म्हणाले मला कळतेय तुमच्या सर्वांची घालमेल का सुरु आहे. हो आता माझे इलेक्शन आले आहे. जनता माझ्या पाठीशी खंबीर आहे, तुम्ही हि रहा म्हणजे झाले. सीमोल्लंघन कार्यक्रमास सर्वांना येता आले पाहिजे असे नियोजन करा. यावेळी  युवा कार्यकर्त्यांनी सीमोल्लंघन सोहळ्याचे शहरात तसेच गावागावात फलक लावण्याचे निशीश्चित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT