sujay vikhe patil 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना हॉटस्पॉट मुकुंदनगरच्या धान्याचा खर्च खासदार विखे पाटील उचलणार

अमित आवारी

नगर: जिल्हा प्रशासनाने शहरातील मुकुंदनगर हा भाग कोरोनामुळे सील केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुकुंदनगरमध्ये राहत असलेल्या अडीच हजार घरांना घरपोहोच स्वस्त धान्य वितरण व्हावे,या स्वस्त धान्याचा खर्च स्वतः खासदार सुजय विखे पाटील यांनी उचलला आहे.

शहरातील कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महापालिकेत आढावा बैठकीचे आज दुपारी आयोजन केले होते. या बैठकीला महापौर बाबासाहेब वाकळे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे आदींसह महापालिकेतील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते

या बैठकीत खासदार विखे पाटील यांनी कोरोनाबाधितांची शहरातील संख्या, होम क्वॉरंटाइन नागरिकांची संख्या, त्यांच्यासाठी केलेल्या उपाययोजना, मुकुंदनगर परिसराची सद्यस्थिती याचा आढावा घेतला. खासदार विखे म्हणाले, मुकुंदनगरमध्ये नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भाजीपाला किराणा यासंदर्भातील अनेक अडचणी त्यांना येत आहेत. त्या दूर होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मुकुंदनगरमध्ये नागरिकांना घरपोच स्वस्त धान्य सेवा कशी उपलब्ध होईल, याबाबतही त्यांनी चर्चा केली.

कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर
महापालिकेतील सर्व सोळाशे कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरच्या बाटल्या खासदार सुजय विखे यांच्याकडून महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातही खासदार विखे यांच्याकडून मदत दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT