mahavitaran.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

महावितरणचे आवाहन : वीज बिलावर शंका घेण्यापेक्षा पडताळणी करा 

सकाळवृत्तसेवा

सांगली - महावितरणच्या वीज बिलाबाबत ज्यांना शंका आहे. त्यांच्यासाठी महावितरणने "लॉकडाउन' काळातील बिल तपासण्याची लिंक www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. ग्राहकांनी बिलावर शंका घेण्यापेक्षा "लिंक' वर जाऊन ग्राहक क्रमांक नोंदवून बिलावरील व मीटरवरील रिडींग पडताळून शंका दूर करावी. तसेच बिल तातडीने भरुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. 

कोरोनामुळे 23 मार्चपासून कडक लॉकडाउन लागू केले. विषाणू संसर्ग टाळण्यासाठी विद्युत नियामक आयोगाच्या व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार वीज मीटर रिडींग, बिलांची छपाई व वाटप या तिन्ही प्रक्रिया थांबविण्यात आल्या. 23 मार्च ते 31 मेपर्यंत किंवा जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत अडीच ते तीन महिन्याचा वीज वापर मागील तिमाहीच्या (डिसेबर, जानेवारी व फेब्रुवारी) सरासरीनुसार देण्यात आला. सरासरी काढलेले तिन्ही महिने हिवाळ्यातील असल्याने या काळात वीजेचा वापर कमी होता. 

प्रत्यक्षात लॉकडाउनमध्ये विजेचा वापर अधिक झाला. त्यामुळे सरासरी कमी तर वापर जास्त झाला. त्या वापराचे बिल जून महिन्यात रिडींग घेतल्यावर पुढे आले. दिलेले वीजबिल अचूक असून ते तीन महिन्याचे आहे. त्याला तीन महिन्यात विभागून महिन्यातील वापरानुसार जो "स्लॅब बेनिफिट' ग्राहकाला मिळायला हवा होता तो जूनच्या बिलामध्ये दिला आहे. बिलाच्या पाठीमागील बाजूस वजा सरासरी देयकाची रक्कम म्हणून उल्लेख आहे. तसेच बिलावर 31 मार्चपर्यंत किती युनीट वापर झाला ते नमुद आहे. त्यास 31 मार्चपूर्वीचा जूना दर लावलेला आहे. 

एक एप्रिलपासून विजेचे नवीन दर लागू झाले आहेत. स्थिर आकारात 10 रुपये व महापालिका हद्दीत अतिरिक्त 10 रुपये अशी वाढ आहे. तसेच वीज आकारात 0 ते 100 पर्यंत प्रति युनीट 41 पैसे तर 101 ते 300 पर्यंत 47 पैसे वाढ केली आहे. परिणामी एकीकडे हिवाळ्यातील वापराचे सरासरी युनीटचे बिल गेल्याने दोन महिने बरे वाटले. लॉकडाउन काळात घरगुती ग्राहकांनी बिलाकडे दुर्लक्ष केले. ऑनलाईन बिल भरण्यास केवळ 11 टक्केच प्रतिसाद मिळाला. ज्यांनी रिडींग पाठविलेले नाही आणि सरासरीने बिल भरलेले नाही अशा ग्राहकांनाच अडीच महिन्याचे एकत्रित बिल गेले आहे. त्यामुळे ग्राहकांनी बिल भरावे असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोटार वाहन विभागावर ‘लक्ष्मीची कृपा’; महापालिकेकडून नवीन वाहने, यंत्रांच्या खरेदीवर ५८ कोटींचा निधी मंजूर

अग्रलेख : आभासी आनंद, खऱ्या वेदना!

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT