पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : मुंबईतील सातारकरांनो घाबरु नका; कोरोनाचा संसर्ग राेखण्यास मदत करा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे; पण तरीही मुंबईकरांचे गावाकडे येण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. मिळेल त्या वाहनाने मुंबईतील सातारकर स्वगृही येत आहे. यातून ग्रामीण भागात संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. लपून छपून मुंबईकर साताऱ्यात येत असले, तरी आपल्या गावी आल्यावर संबंधितांनी नोंदणी करू प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
 
सध्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेशाला बंदी आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवेसाठी असलेली वाहनेच येत आहेत. सध्या पुणे व मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे येथे संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत आहे. त्यापाठोपाठ साताऱ्यातही कोरोनाच सात रुग्ण आढळलेले आहेत. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक केल्या आहेत. अशा परिस्थितीत सहजासहजी मुंबईतून विनाकारण कोणीही साताऱ्यात येऊ शकत नाही; पण मुंबईतील काहींनी गड्या आपला गाव बरा...काही करून गावी जायचेच असा निर्धार केला आहे. त्यानुसार रात्रीच्या वेळी दुधाच्या पॅक बंद गाडीतून प्रवास करून मुंबईतून सातारा जिल्ह्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे.

मुंबईत नोकरी, व्यवसायानिमित्ताने गेलेले सातारकर आता संचारबंदीमध्ये अडकले आहेत, तसेच मुंबईत कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्यामुळे आपल्या गावाकडे जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे; पण रस्ते व तपासणी असूनही काहींनी विविध युक्‍त्या काढून काही मुंबईकर घरी पोचत आहेत. यासाठी अत्यावश्‍यक सेवेसाठी असलेल्या वाहनांचा वापर होत आहे. यामध्ये पॅकबॉडी असलेल्या गाड्यांचा वापर होत आहे. मुंबईतील सातारकरांनी घरी येऊ नये, असे म्हणता येणार नाही. त्यांनी जरूर यावे; पण सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रसार यातूनच होऊ शकतो. साताऱ्यातील ग्रामीण भागात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. कारण प्रत्येक गावाने कडक उपाययोजना करून बाहेरच्या ठिकाणचा माणूस आपल्या गावात येणार नाही, याची खबरदारी घेत आहे, तरीही रात्रीच्या वेळी मिळेल त्या वाहनाने जादा पैसे देऊन प्रवास करून मुंबईहून काही सातारकर परत घरी येत आहेत. त्यांच्यातून गावातील त्यांच्या नातेवाइकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने सुरक्षित राहणे गरजेचे आहे. अशा वेळी मुंबईतील सातारकरांनी थोडा धीर धरावा. 


गावी आल्यास शासन प्रतिनिधींकडे नोंद करा 

मुंबईतील सातरकरांना "लॉकडाउन' शिथिल केल्यावर फार तर प्रवास करावा. जरी ते स्वगृही आले तरी त्यांनी सर्वप्रथम गावातील शासन प्रतिनिधींकडे आपण गावी आल्याची नोंद करून ते सांगितले, त्याप्रमाणे प्रतिबंधात्मक सर्व उपायांची अंमलबजावणी करावी. स्वत:ला इतरांच्या संपर्कात येणे टाळावे. किमान 14 दिवस तरी घरातील लोकांशी संपर्क टाळावा, जेणे करून कोरोनाचा फैलाव रोखण्यात आपल्याला यश येईल.

उद्धवजी, लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनंही...

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची उद्धव सरकारपुढे आर्त हाक

फक्त एका फाेनवर ज्येष्ठांना आणि दिव्यांगांना मिळणार घरपोच पेन्शन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे! पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, धुळे जळगावला रेड अलर्ट

Muslim Polygamy Case : मुस्लिम पुरुषांच्या बहुपत्नीत्वाला याचिकेद्वारे आव्हान, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : कोयना-वारणा धरणांच्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा-वारणा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली

Russia-Ukraine Conflict : इराण-अमेरिका युद्ध सुरू असताना मध्येच युक्रेन-रशियाचं काय बिनसलं?

R. Ashwin: वैभव सूर्यवंशीला डच्चू, भुवनेश्वर कुमारला संधी; 2027 वर्ल्ड कपसाठी आर. अश्विनचा संभाव्य भारतीय संघ चर्चेत

SCROLL FOR NEXT