nitin kapadnis.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

महापालिकेतर्फे प्रत्येक वॉर्डात  रोज दोनवेळा औषध फवारणी 

सकाळवृत्तसेवा

सांगली-कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता दिवसातून दोन वेळा प्रत्येक वार्डात औषध फवारणीचा निर्णय घेतला आहे. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 


सांगली मिरज आणि कुपवाड शहरात महापालिकेचे एकूण वीस वॉर्ड आहेत. या प्रत्येक वार्डात सकाळी आणि दुपारी असे दोन वेळेस जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी आठ ते दुपारी दोन आणि त्यानंतर दुपारी 3 ते रात्री दहा वाजेपर्यंत हे औषध फवारणीचे काम चालणार आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच सफाई कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांना मदतीला घेऊन हे जंतुनाशक फवारणीचे काम होणार आहे. 


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासाठी शहरात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. त्यामुळेच अतिरिक्त पथकांसह प्रत्येक वॉर्डात दोन वेळा जंतूनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. महानगरपालिकेने जंतूनाशक औषध फवारणीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले आहे. 
शहरात महापालिकेचे आरोग्य पथक होम क्वॉरंटाईन केलेल्या नागरिकांची दिवसातून दोन वेळा चौकशी करत आहे. या रोगाचा विषाणू पसरू नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शहरात स्वच्छतेची दक्षता घेण्यात येत आहे. शहरातल्या प्रत्येक भागात औषध फवारणी होईल. महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दक्ष असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करत असल्याचे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूसंपादनासाठी पालिकेकडून १३६ कोटींचा निधी, एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण होणार!

भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनांवर गंडांतर; चार हजार योजनांकडे १४८ कोटींची थकबाकी; आता कनेक्शन कापणार?

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT