corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

महापालिकेतर्फे रॅपिड अँटीजेन चाचणी सुरु...आजारी नागरिकांची तपासणी

बलराज पवार

सांगली- महापालिका क्षेत्रातील कंटेन्मेंट झोनमधील 50 वर्षांवरील नागरिक तसेच बहुविध आजार असणाऱ्या व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यास संबंधित रुग्णास तातडीने कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करुन पुढील उपचार केले जाणार आहेत. 

महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने घर टू घर सर्व्हे करण्यात येत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची तपासणी आणि त्यांच्या आजाराची माहिती घेण्यात येत आहे. त्यातच आता रॅपिड अँटीजेन चाचणीही करण्यात येणार आहे. 50 वर्षांवरील नागरिक तसेच बहुविध आजार असणाऱ्या व्यक्तींची चाचणी होणार आहे. या चाचणीमुळे अवघ्या अर्ध्या तासात अहवाल मिळून नागरिकांना कोरोना आहे की नाही ते स्पष्ट होईल. त्यामुळे अहवाल पॉझिटीव्ह आल्यास या संबंधितांना कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. 

महापालिकेचे पथक घरी सर्व्हेसाठी आल्यावर त्यांना आवश्‍यक माहिती द्यावी. तसेच घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आजारांची माहिती द्यावी. पथकाने अँटीजेन चाचणी करण्याची विनंती केल्यास त्यांना सहकार्य करावे. विरोध करु नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाला दोन दिवसांपुर्वीच जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांनी रॅपिड अँटीजेन चाचणीचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर आता महापालिका क्षेत्रात या चाचण्या करण्यात येत आहेत. महापालिकेकडे चार हजार रॅपिड अँटीजेन चाचणीचे कीट तयार आहेत. आणखी दहा हजार कीट खरेदी करण्याचे सुतोवाच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

129 मध्ये दोन पॉझिटीव्ह 
महापालिकेच्या पथकाने आज 129 रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्या. यात दोन व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आल्या आहेत. त्यांना तात्काळ कोविड केअर सेंटरला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

Marathi News Live Updates : आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सूर्यनारायण डूल्ला निलंबित; विद्यार्थ्यांच्या तीन दिवसांच्या आंदोलनानंतर कारवाई

Daily Horoscope: आजचे राशी भविष्य २१ सप्टेंबर २०२६

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

SCROLL FOR NEXT