municipal worker beaten up by two person 
पश्चिम महाराष्ट्र

पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दोघांकडून मारहाण

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर येथील घटना; पोलिसात गुन्हा

मलकापूरः सांडपाण्याचा चर काढायला सांगणारा तू कोण अशी विचारणा करत येथील पालिकेच्या बांधकाम पर्यवेक्षकास दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना मलकापूर येथे घडली आहे. याप्रकरणी बाबूराव शिंदे (वय ५३, रा. लक्ष्मीनगर, मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शहर पोलिसात दाखल झाला आहे. रोहित तडक, गजानन लक्ष्मण रैनाक (रा. मलकापूर) अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांची माहिती अशी, श्रीकृष्ण शिंदे हे मलकापूर पालिकेत बांधकाम पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी शिंदे पालिकेतील बैठक संपवून निघाले असताना रोहित तडक व गजानन रैनाक यांनी शिंदे यांना अडवले.

पाखले यांच्या शौचालयाच्या पाण्यासंदर्भात चर काढायला सांगणारा तू कोण? नगरपंचायतीचा मालक झाला काय? अशी दोघांनी विचारणा केली. तुला दाखवतो, असे म्हणत दोघांनीही श्री. शिंदे यांना बेदम मारहाण केली. बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांनी मारहाण करणाऱ्यांना थांबवले. शासकीय काम करत असताना संगनमत करून मारहाण केल्याची तक्रार शिंदे यांनी पोलिसांत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना १० वर्षांनी दिलासा, ग्रंथालय कंत्राट प्रकरणी विशेष न्यायालयाकडून दोषमुक्त

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Karnataka Drought Relief : दुष्काळग्रस्तांसाठी मोठी बातमी! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार; सरकारच्या तिजोरीवर पडणार 1,250 कोटींचा आर्थिक भार

Maharashtra Ganesh Visarjan Live: दगडूशेठ बाप्पा उत्सव मंडपातून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ; यंदा वक्रतुंड रथातून भव्य विसर्जन मिरवणूक

Kolhapur Ganesh Visarjan : गणरायाला आज निरोप नियमभंग करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT