Murder of a mother by a child at Ambegaon in Kadegaon taluka 
पश्चिम महाराष्ट्र

खोरे डोक्‍यात घालून मुलाकडून आईचा खून; कडेगाव तालुक्‍यातील आंबेगाव येथील घटना

संतोष कणसे

कडेगाव (जि. सांगली) : अजून किती दिवस तुला जेवण घालू, असे बोलल्याचा राग मनात धरून मुलाने साठ वर्षीय जनाबाई शिवाजी माने या आपल्या जन्मदात्या आईच्या डोक्‍यात लोखंडी खोरे घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आंबेगाव (ता. कडेगाव) येथे घडली. याप्रकरणी फरार असलेला संशयित आरोपी आप्पासाहेब शिवाजी माने (वय 34, रा. आंबेगाव) याला कडेगाव पोलिसांनी अटक केली. याबाबत सत्यवान शिवाजी माने यांनी संशयित आरोपी सख्खा भाऊ आप्पासाहेब माने याच्याविरुद्ध कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आंबेगाव येथे जनाबाई माने या पती शिवाजी माने यांचेसह आपल्या सत्यवान व आप्पासाहेब या दोन मुलासह येथे राहतात, तर जनाबाई यांचा धाकटा मुलगा आप्पासाहेब हा कोणतेही काम करीत नसल्याने जनाबाई त्याला "काही तरी काम कर', असे म्हणत असत.

2 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास जनाबाई या घराबाहेर कपडे धूत होत्या; तर त्यांचा मोठा मुलगा सत्यवान हा घरासमोर उभा होता. यावेळी जनाबाई यांनी आप्पासाहेबला, "किती दिवस तू असा न काम करता राहणार आहेस, अजून किती दिवस तुला जेवण घालू', असे त्या म्हणाल्या. 

या बोलण्याचा राग मनात धरून आप्पासाहेब याने बाजूला असलेल्या लाकडी दांडक्‍याचे लोखंडी खोरे हातात घेऊन आई जनाबाई हिच्या डाव्या कानावर डोक्‍यात मारून जखमी केले. हे पाहून मोठा भाऊ सत्यवान हा पळत त्या ठिकाणी आला असता, आप्पासाहेब याने हातातील लोखंडी खोऱ्याने सत्यवान यांच्या डोक्‍यात मारले; तसेच वडील शिवाजी माने यांनाही हाताने मारहाण व शिवीगाळ करून दमदाटी केली.

या घटनेत सत्यवान व वडील शिवाजी रामू माने हे दोघेही जखमी झाले. गंभीर जखमी असलेल्या जनाबाई यांना तत्काळ सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान रविवारी (ता. 14) त्यांचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर संशयित आप्पासाहेब हा फरारी होता. पोलिसांनी त्याला आज सायंकाळी 6.39 वाजता आंबेगाव परिसरातील शेतात अटक केले. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे करीत आहेत.

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मिसिंग लिंकनंतर पहिल्यांदाच द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी

Pune BJP Woman Leader: पुण्यातील महिला भाजप नेत्याचं निधन, वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Highway Accident: मुंबई बंगळूर हायवेवर भीषण अपघात, टाटा अल्ट्रोजचा चुराडा; मुंबईच्या दोघांचा मृत्यू, १२ जण जखमी

पद्मिनी कोल्हापूरे-प्रीती सप्रू रस्त्यावरच कचाकचा भांडल्या; संतापलेल्या पोलिसांनी सुनावलं, Viral Video

Mongoose satire story : मुंगूस आणि पाळलेला माणूस

SCROLL FOR NEXT