Murder of a youth at Nimsod over a land dispute 
पश्चिम महाराष्ट्र

शेतजमिनीच्या वादातून निमसोड येथे तरुणाचा खून 

संतोष कणसे

कडेगाव : निमसोड (ता. कडेगाव, जि. सांगली ) येथे शेतजमिनीच्या वादातून सख्खा चुलत भाऊ, चुलता व चुलती यांनी सुरेश ऊर्फ सूर्यकांत आत्माराम जाधव (वय 36, रा. निमसोड) या तरुणाच्या डोक्‍यात लाकडी दांडक्‍याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित चुलत भाऊ कैलास भगवान जाधव (वय 39), चुलते भगवान दाजी जाधव (वय 65), चुलती रुक्‍मिणी भगवान जाधव (वय 60, तिघे रा. निमसोड) यांच्याविरोधात कडेगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

यावेळी मारामारीत सूर्यकांत यांची पत्नी रोहिणी जाधव (वय 33), आई द्रौपदा आत्माराम जाधव (वय 60), छबूताई आत्माराम जाधव (वय 55, सर्व रा. निमसोड) या तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. या खून प्रकरणी संशयित भगवान जाधव याला रात्री उशिरा ताब्यात घेतले, तर अन्य संशयितांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. 

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, निमसोड सावंत मळा येथील सुरेश जाधव व चुलते भगवान जाधव, चुलत भाऊ कैलास जाधव यांच्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेत जमिनीचा वाद आहे. यातून त्यांच्यात अनेक वेळा भांडणे झाली आहेत. गावातील काहींनी त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थीही केली होती. तरीही त्यांच्यातील मिटला नव्हता, तर तो सतत धुमसत होता. 

आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्यांच्यातील वाद उफाळून आला. सूर्यकांत जाधव व भगवान, कैलास जाधव यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी संशयित कैलास व भगवान जाधव यांनी लाकडी दांडक्‍याने सूर्यकांत याच्या डोक्‍यात जोरदार घाव घातला. त्यामध्ये सूर्यकांतच्या डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संशयित भगवान व कैलास यांनी सुरेश ऊर्फ सूर्यकांतला मोटारीतून कडेपूर येथील खासगी दवाखान्यात नेले; परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. 

या खून प्रकरणाची माहिती मिळताच कडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचेसह पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच संशियतांचा शोध सुरू केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम कडेगाव पोलिस ठाण्यात सुरु होते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे हे करीत आहेत. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT