Murderous attack on youth in Kupwad; Both in custody, including a minor 
पश्चिम महाराष्ट्र

कुपवाडमध्ये तरुणावर खुनी हल्ला; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

शैलेश पेटकर

कुपवाड : शहरातील कापसे प्लॉट येथील तरुणावर पूर्ववैमान्यस्यातून चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गणेश तानाजी जाधव (वय 20, परमानंद कॉलनी, कापसे प्लॉट) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुपवाड पोलिसांनी तातडीने संशयित प्रशांत राजू महाजन (वय 19, रा. कापसे प्लॉट) यास मध्यरात्री अटक केली. त्याच्यासह अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आले आहे. काल रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की गणेश जाधव हा शिक्षण घेत आहे. कुटुंबासह कापसे प्लॉट येथील परमानंद कॉलनीत राहतो. काल रात्री दहाच्या सुमारास जेवण करून घराबाहेर पडला. बाहेरील गाडीवर तो बसला होता. संशयित त्याच्या घरासमोर राहण्यास आहे.

साडेदहाच्या सुमारास संशयित प्रशांत महाजन व त्याचा मित्र हे गणेश जवळ आले. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून वाद घालण्यास सुरवात केली. बाहेर का बसला आहेस, असा जाब विचारत शिवीगाळ करत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर प्रशांत महाजन याने चाकूने पोटात वार केला. गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर दोघेही पळून गेले. 

घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक निरज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी गणेश यास आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रात्री मध्यरात्री दोघा संशयितांविरोधात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक उबाळे यांनी संशयितास मध्यरात्री अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले.

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माशी शिंकली…! IPL 2026 ला सुरुवात होण्यापूर्वीच CSK च्या स्टार खेळाडूने माघार घेतली, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

Mokhada News : थायलंडच्या सफेद जांभळाची चव आता मोखाड्यात... उच्च शिक्षित डॉ. सुमित ढाक या तरुणाचा अभिनव शेती प्रकल्प.

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या मनसैनिकांचे फलक चर्चेत

Phulambri News : फुलंब्रीत गोवंश कत्तलीचा मोठा पर्दाफाश...पोलिसांचा छापा; आठ जनावरे जिवंत ताब्यात

Gold Rate Update : गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

SCROLL FOR NEXT