musician people in marriage the business again start after corona in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

बॅंड, बाजा, बारात ; वाजंत्री व्यवसायाचा ब्रेक निघण्यास सुरवात

शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड (सांगली) : कोरोनामुळे गेली वर्षभर वाजंत्री व्यवसायास लागलेला ब्रेक आता निघण्यास सुरवात झाली आहे. अनलॉक काळात लग्न कार्ये हौसेत होऊ लागली आहेत. लग्नाचे देवक करण्यासाठी, वरातीसाठी आता बॅंडबाजा, बॅंजो वाजू लागले आहेत. गावातील चौकातून देवक करताना तसेच वरातीसमोर अहो, मामी तुमची मुलगी लयं सुंदर... पोलीसवाल्या... सायकलवाल्या... ब्रेक लावुन थांब... तू मुंगळा... मै गुड की गडी... आँखे तो खोलो स्वामी... वो बुलाती है... मगर जानेका नही... यासारख्या नव्या जुन्या मराठी, हिंदी गाण्यांवर तरुण कुरवले मंडळी ठेक्‍यात ताल धरू लागल्याने वर्षभरापूर्वी लग्नातील हरवलेली हौस वाळवा तालुक्‍यातील ग्रामीण भागात पून्हा परतू लागली आहे. 

लग्नसराईच्या चार महिन्यांच्या काळात कलाकारांना वर्षाची कमाई करुन देणारा वाजंत्री व्यवसाय लॉकडाऊन काळात वर्षभर बंद राहिला. विवाह कार्यावर मर्यादा आल्याने व्यवसायावर उपजीविका अवलंबून असलेल्या गोपाळ समाजाचे जगणे मुश्‍कील झाले. कलाकारांनी उधार, उसनवार करुन वर्ष काढले. वेळप्रसंगी सावकारी कर्ज घेऊन पोटाची खळगी भरली. अनलॉकच्या काळात लग्नाचा धडाका सुरु झाला आहे. बॅंड, बॅंजोस मागणी येऊ लागल्याने गोपाळ समाजाला जगण्यासाठी पुन्हा अच्छे दिन येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

'किल्लेमच्छिंद्रगड येथील गावकुसाबाहेर राहणाऱ्या गोपाळ समाजाचा भटक्‍या विमुक्त जाती जमातीत समावेश होतो. बहुतांशी कुटुंबे भूमिहीन. कलाकारांचा राज्यभर लौकीक. ठराविक कलाकारांना इनामी जमिनी आहेत. काही कलाकारांच्या जमीन खासगी सावकारानी 99 वर्षाच्या कराराने बळकाविल्याची चर्चा आहे. समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी शासनाने लक्ष देऊन व्यवसायासाठी कर्जे देण्याची मागणी आहे. 

"सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात समाज मोठ्या प्रमाणात वाजंत्री व्यवसायात. कोरोनाने जगणे मुश्‍किल. वृध्द कलाकारांना शासनाने मानधन द्यावे. व्यवसायासाठी अल्पव्याजाने कर्जे हवीत. प्रगतीसाठी शिक्षिताना नोकऱ्यांत संधी हवी."

- धर्मा पवार, मालक, झंकार बॅंड कं. किल्लेमच्छिंद्रगड 

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT