is.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आष्ट्यातील मुस्लिम समाजाचा इस्तेमा स्थगित

सकाळवृत्तसेवा

आष्टा शहरांमध्ये पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते गेल्या तीन महिन्यापासून अष्टा सर्वोदय साखर कारखाना परिसरातील माजी नगराध्यक्ष श्रीमती मंगलादेवी शिंदे व सर्वोदय साखर कारखान्याच्या जागेवरती तयारी करण्यात येत आहे. दीडशे एकर जागा यासाठी तयार करण्यात आली आहे.

मात्र गेल्या काही दिवसापासून राज्यात संसर्गजन्य कोरोनो वाढू लागल्यामुळे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी 16 मार्च ते 31 मार्च पर्यंत जिल्ह्यात शासकीय कार्यक्रम सभा मेळावे यात्रा महोत्सव धार्मिक कार्यक्रम तसेच गर्दीत होणारे सर्व कार्यक्रम बंद करण्याचे आव्हान केले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत, कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या दृष्टीने एकमेकांना संसर्ग होऊ नये यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने 22 मार्च रोजी होणारा सांगली जिल्हा मुस्लिम समाजाचा इस्तेमा 2020 महोत्सव स्थगित करण्यात आला आहे.

तो पुढे ढकलण्यात आला आहे. सांगली जिल्हा मुस्लिम समाजातील पदाधिकारी अधिकारी, संघटना व कार्यकर्त्यांची नुकतीच सर्वोदय सहकारी साखर कारखाना येथे बैठक झाली.या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT