nagar became a kachara kundi free city 
पश्चिम महाराष्ट्र

नगरमधून कचराकुंड्या हद्दपार

अमित आवारी

नगर : ""महापालिकेने "स्वच्छ भारत' अभियानांतर्गत नगर शहरस्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. घरोघरी घंटागाड्या नेणे, रस्त्यांजवळील मातीचे ढीग हटविणे, कचरा उचलणे, अशी कामे सुरू आहेत. घरांतूनच कचरा उचलला जात असल्याने शहरात कचराकुंडीची आवश्‍यकता भासत नाही. त्यामुळे नगर शहरातून कचराकुंड्या हद्दपार करण्यात आल्या आहेत,'' अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. 

शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. नगर शहर देशात पहिल्या 100 शहरांत आल्यास 11 कोटी रुपयांचे बक्षीस महापालिकेला मिळणार आहे. याशिवाय स्वच्छतेच्या कामासाठी भरीव निधीही मिळविण्यासाठीचा राजमार्ग खुला होईल. त्यामुळे महापालिकेकडून कधी नव्हे ते शहरात सध्या स्वच्छतेची मोहीम राबविली जात आहे. 

पूर्वी 106 कचराकुंड्या, आता शून्य

मोहिमेची सुरवातीलाच, घंटागाड्या घरोघरी जातील याची तजवीज केली आहे. त्यामुळे घरातील कचरा रस्त्यावर न येता थेट घंटागाड्यांमध्ये जात आहे. ही मोहीम सुरू होण्यापूर्वी शहरात 106 कचराकुंड्या होत्या. आता नगर शहरात कचराकुंडीच उरली नाही. शहरातील कचरा व मातीचे ढीग जेसीबीच्या साहाय्याने हटविले जात आहेत. शहर स्वच्छ व सुंदर दिसेल याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. काही नागरिक सवयीप्रमाणे रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. त्यांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले. 

भिंगारमध्ये कचरासंकलनासाठी घंटागाडी

नागरिकांनी घरातील कचरा रस्त्यावर न टाकता कचरा गाड्यांमध्ये टाकावा, असे आवाहन भिंगार येथील छावणी परिषदेतर्फे करण्यात आले आहे. अहमदनगर छावणी परिषद कार्यालयाने मे 2010 मध्ये घरोघरी जाऊन घनकचरा संकलनासाठी निविदा काढली होती. परंतु काही कारणास्तव त्या निविदेबाबत उच्च न्यायालय औरंगाबाद येथे याचिका दाखल झाल्यामुळे या कामास विलंब झाला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर्न कमांड पुणे या कार्यालयाकडून 6 डिसेंबर 2019 रोजी हे काम करण्यास परवानगी दिली. त्यानुसार बोर्डाने ता. 16 डिसेंबर 2019 रोजी ठराव करून घंटागाडीमार्फत घनकचरा संकलन करण्याचे काम पुणे येथील ग्लोबल उंडीचा ट्रॅव्हल्स या संस्थेस देण्याचे मंजूर केले. त्यानुसार ग्लोबल इंडिया ट्रॅव्हलला कार्यारंभ आदेश दिले. 

कचऱ्याचे वर्गीकरण करावे

प्रत्येकाने आपल्या घरातील, दुकानातील ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा व आपले भिंगार शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले आहे. आपल्या परिसरात जर घंटागाडी येत नसेल, तर नागरिकांनी त्वरित आपल्या प्रभागातील सदस्य अथवा छावणी परिषद कार्यालय अथवा ग्लोबल इंडिया ट्रॅव्हल्सचे सुपरवायझर अजय थोरात मोबाईल नंबर 9921355854 यांच्याशी संपर्क करावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time Table बघा अन् लागा तयारीला...

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Latest Marathi News Live Update : 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची एंट्री; प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनीच सांगितलं नाव

Ganesh Naik : १५०० बिबट वनतारामध्ये स्थलांतरित व १००० पिंजरे खरेदीसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT