भंडारदरा
भंडारदरा  
पश्चिम महाराष्ट्र

भंडारदरा जलाशय तिसऱ्यांदा भरून वाहू लागला

शांताराम काळे

अकोले : मुळा, प्रवरा, आढळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, भंडारदरा जलाशय पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा भरून वाहू लागला आहे. 'स्पिल वे'मधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असून, अतिवृष्टीमुळे भात खाचरात पाणी साचल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भंडारदरा जलाशयातून ५६७३ क्युसेक्स, वाकी धरणातून २१९९ क्युसेक्स, निळवंडे धरणातून १९,८७५ क्युसेक्स, मुळा धरणातून ९००० क्युसेक्स व अधला धरणातून ११०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून पाण्याचा जोर वाढला असून, हा विसर्ग हळूहळू वाढवण्यात येत आहे. भंडारदरा पूस ९५ मिलीमीटर, निळवंडे ८३, अधला ४५, रतनवाडी १२२, घाटघर ८३, पांजरे ९७, वाकी ७५, अकोले ९५ मिलीमीटर झाला असून, रस्ते बंद झाले आहेत.

सर्वच ठिकाणची वाहतूक ठप्प झाली असून आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे बांधबंदिस्त फुटले आहे. अकोले तालुक्यात सर्वदूर पाउस पडत असून, मुळा व प्रवरा नदीला पूर आला आहे. रस्त्यावर व ओढ्यावर गुड्घाबर पाणी साचल्याने वाहतूक बंद आहेत, तर आदिवासी भागातील शाळांना सलग दोन दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT