OverNagarNews coming the obstacles at Saturnishanapur devotees happy 
पश्चिम महाराष्ट्र

आता शनिदेव पावणार, ती साडेसाती सरली

विनायक दरंदले

सोनई : देव आहे पण देऊळ नाही, घरं आहेत पण दरवाजा नाही, झाड आहे पण सावली नाही, असं मुलखावेगळं गाव म्हणून शनिशिंगणापूरची ओळख आहे. परंतु इथल्या शनिदेवाच्या दर्शनासाठी भाविकांना साडेसाती लागली होती. बळजबरीने भाविकांच्या माथी वस्तू मारल्या जात होत्या. 

शनिशिंगणापूर येथे भिकारी, गंध लावणारे, दोरा बांधणारे व छायाचित्र काढण्यासाठी पाठीमागे लागणाऱ्यांमुळे 
शनिदर्शनास लागलेली अडवणुकीची साडेसाती देवस्थानच्या सुरक्षा विभागामुळे हटली 
आहे. या विशेष मोहीमेचे भाविकांतून स्वागत होत आहे. यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्यामुळे तेथे अनेक महत्त्वाचे निर्णय होत आहेत. 


चोरी होत नसलेलं गाव 
भाविकांना साडेसातीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसविण्याचे प्रकार वाढले होते. गावाचे व देवस्थानचे नाव खराब होवू लागले. मुलखावेगळ्या गावाची फसवणूक व पूजा साहित्यात लुटमार करणारं गाव अशी वाईट प्रतिमा झाली होती. मागील महिन्यात यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी 
विश्वस्त मंडळाला गाव हिताच्या सूचना केल्यानंतर देवस्थानने लटकू बंदचा धाडसी निर्णय घेतला. 

आज देवस्थानच्या सुरक्षा विभागाने महाद्वार, मुख्य रस्ता व दर्शन रांग परिसरात भाविकांना त्रास देत असलेल्या सोळा भिकाऱ्यासह दोन गंध लावणारे व एक मोटारसायकल वर खाद्यपदार्थ विकत असलेल्या 
व्यक्तीस ताब्यात घेवून कार्यालयात दिवसभर बसवून ठेवले. या कारवाईनंतर दिवसभर भाविकांचे दर्शन सुलभ झाले. आज दिवसभर दर्शनरांग व मंदीर परीसराने मोकळा श्वास घेतला. 

छल्ला मारतोय डल्ला 
गावात घोड्याच्या नालापासून बनविलेली अंगठी अशी बतावणी करत विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. या अंगठीला छल्ला म्हटले जाते. शनिवार-विवारी या छल्ल्याच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. बनावट नाल व काळ्या तिळाचे तेल म्हणूनही भाविकांना अव्वाच्या सव्वा दराने विकले जाते. 

लटकू बंदमुळे आनंद 
शिर्डी सोडली की वाहनांचा पाठलाग करणारे मोटारसायकलवरील लटकू खूपच त्रास देत होते. त्यांच्यामुळे जादा पैसे देवून पूजेचे ताट घ्यावे लागत. हा प्रकार बंद झाल्यामुळे मनाला समाधान लाभत आहे. 
- षीकेश पटेल,बडोदा, भाविक. 

सगळे बंद केले 
यापूर्वी भक्तांना विविध अडवणुकीमुळे दर्शनाचा आनंद मिळत नव्हता. वाईट प्रकाराबद्दल तक्रारीचा सूर असायचा. आता भाविकांच्या सुविधेला पूर्ण अग्रक्रम देत त्रास देणाऱ्यांविरुद्ध कडक मोहीम हाती घेतली आहे. याकामी पोलिस यंत्रणेचे सहकार्य लाभत आहे. 
- गोरख दरंदले, सुरक्षाधिकारी, शनैश्वर देवस्थान 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT