Nagars party workers do not take pride in mortgages Sharad Pawar criticized
Nagars party workers do not take pride in mortgages Sharad Pawar criticized 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : नगरचे कार्यकर्ते स्वाभिमान गहाण ठेवत नाहीत; शरद पवारांचा टोला

सकाळवृत्तसेवा

लोकसभा 2019
नगर : ``नगरच्या लोकसभा निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. सध्याची परिस्थितीसारखीच यापूर्वीही परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यावेळी अशी स्थिती निर्माण होते, त्यावेळी सर्वसामान्यांची शक्ती ही धनसंपत्तीवर मात करते, हा इतिहास आहे. यावर्षीही 1991 ची पुनरावृत्ती करायची आहे. कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन करून नगरचे कार्यकर्ते स्वाभिमान गहाण ठेवत नाहीत,`` असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काॅंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता लगावला.

नगरमध्ये पवार यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सीद्वारे आज दुपारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, ``1991 मध्ये यशवंतराव गडाख यांना उमेदवारी दिली. त्यावेळी सहकारातील धनसंपत्तीने (बाळासाहेब विखे) आमच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला. परंतु सामान्यांनी आम्हाला साथ दिली. या वर्षीही अनेक नेत्यांनी आमच्याकडे उमेदवार मागितली. बाहेरील उमेदवार आयात करण्याबाबतही प्रस्ताव आले होते. मात्र आमच्या बैठकीत हा विषय चर्चिला जावून आपल्याकडे चांगले कार्यकर्ते असताना इतरांना संधी कशासाठी द्यायची, असा निर्णय झाला. नगर, श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात आपले आमदार आहेत. काॅंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मतेही चांगली मिळतात. सर्व सहा मतदारसंघात तीच स्थिती आहे. असे असताना बाहेरील उमेदवार आयात करायचा नाही, याबाबत आम्ही ठाम होतो. त्यामुळे यापुढेही आपल्याच कार्यकर्त्याला संधी मिळेल, यात शंका नाही. याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच जाहीर करतील. नगरचा कार्यकर्ता स्वाभिमान गहाण ठेवत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाशी प्रामाणिक राहून काम करावे. पक्ष देईल त्या उमेदवाराला विजयी करावे,`` असे आवाहन पवार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT