Nagavade sugar factory will give 10 thousand to every Gram Panchayat 
पश्चिम महाराष्ट्र

याला म्हणतात मदत... नागवडे साखर कारखाना देणार प्रत्येक ग्रामपंचायतीला 10 हजार 

संजय आ. काटे

श्रीगोंदे : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी नागवडे साखर कारखाना श्रीगोंदे नगरपालिकेला 50 हजार रुपये आणि तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला 10 हजार रुपयांचा तातडीचा मदत निधी देणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी ही माहिती दिली. 

नागवडे म्हणाले, की कोरोनाचे संकट मोठे असून, सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले पाहिजे. तालुक्‍यात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. तरीदेखील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. या कठीण परिस्थितीत विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावे.

घाबरून न जाता आवश्‍यक खबरदारी घेतल्यास आपण या संकटापासून स्वतःचे, कुटुंबाचे व आपल्या समाजाचे आणि देशाचेही संरक्षण करू शकतो. त्यादृष्टीने नगरपालिकेसह प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर काम सुरू आहे. या कामांसाठी नागवडे कारखान्याने मदत निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

नगराध्यक्ष शुभांगी पोटे व मुख्याधिकाऱ्यांच्या मागणी प्रस्तावानुसार नगरपालिकेला 50 हजार रुपयांचा मदत निधी देणार असून, तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी 10 हजार रुपयांचा तातडीचा मदत निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निधी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांनी कारखान्याकडे मदत निधी मागणी प्रस्ताव समक्ष किंवा ई-मेलद्वारे पाठवावेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या ग्रामपंचायतीला 10 हजार रुपयांचा मदत निधी तातडीने वर्ग केला जाईल.

या निधीचा वापर कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना, गरजूंना जीवनावश्‍यक वस्तूपुरवठा, अन्नदान, निर्जंतुकीकरण, औषध फवारणी, तसेच रुग्णांवरील औषधोपचार व सॅनिटायझर, मास्क खरेदी यासाठीच केला जाणे अपेक्षित आहे, असेही नागवडे म्हणाले. 

कारखान्यातर्फेही उपाययोजना 
नागवडे कारखान्याकडूनदेखील प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात असल्याचे सांगत नागवडे म्हणाले, ""कारखाना आवारासह कार्यस्थळाच्या परिसरासह कामगार वसाहत, कारखान्यावरील दुकानचाळ परिसर, श्री लिंगाळेश्वर मंदिर परिसर निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. गरज पडल्यास या कामी स्थानिक प्रशासनालाही आर्थिक सहकार्य करण्याची आमची तयारी आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT