Nagwade's entry into BJP today in the presence of the Chief Minister 
पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज नागवडे यांचा भाजपात प्रवेश

संजय आ. काटे

श्रीगोंदे (नगर) : कॉंग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे समर्थकांसह आज भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहेत. सिद्धटेक (ता. कर्जत) येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस नागवडे यांचे समर्थकांसह स्वागत करणार आहेत.

मुंबई येथे गेल्या आठवड्यात नागवडे यांचा झालेला प्रवेश गोपनीय ठेवण्यात आला. मात्र, आता निवडणूक दहा दिवसांवर आली. त्यामुळे जाहीर प्रवेश करण्याच्या हालचाली दोन दिवसापासून सुरू होत्या. काल (गुरुवारी) नागवडे व त्यांचे समर्थकांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी लोणी येथे प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर आजच्या प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला.

नागवडे यांच्यासह नगराध्यक्ष शुभांगी पोटे व त्यांचे सहकारी नगरसेवकही भाजपात जाणार असल्याचे समजते. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उपस्थित असणाऱ्या एका नागवडे समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार अनुराधा नागवडे यांच्या प्रवेशावर अजून प्रश्नचिन्ह आहे. त्या कॉंग्रेसच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत निवडून गेले असून, त्या आज प्रवेश करणार की, नंतर याबाबत अजूनही ठरलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT