Nala mujwale, water came Palus- Amanapur road
Nala mujwale, water came Palus- Amanapur road 
पश्चिम महाराष्ट्र

नाले मुजवले, पाणी आले पलूस- आमणापूर रस्त्यावर

संजय गणेशकर

पलूस : पलूस- आमणापूर या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारी मुजवल्याने व काही ठिकाणी गटारीच नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून व वाहून रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या या दुरवस्थेकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले आहे. 

पलूस - आमणापूर या रस्त्यावरून कोल्हापूर, पेठवडगाव, आष्टा, पलूस , विटा या मार्गांकडून ये -जा करणाऱ्या वाहनांची प्रचंड संख्या आहे. तसेच शेतकरी व पलूस तालुक्‍यातील नागरिकांची मोठी वर्दळ रस्त्यावर असते. इतकी वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असताना हा रस्ता बांधकाम विभागाकडून दुर्लक्षित झाला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन रस्त्याची दुरावस्था झाल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून कसरत करत मार्ग काढावा लागतो. 

तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. गोंदीलवाडी फाटा ते पीरापर्यंत तसेच इतर बऱ्याच ठिकाणी गटारी व्यवस्थित नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहात आहे. अनेक शेतकरी आपल्या विहरीतील ज्यादा झालेले पाणी रस्त्यावर सोडतात. तसेच अनेकांनी आपल्या शेतात जाण्यासाठी पाईप न टाकता गटारी मुजवल्या आहेत.या दोन्ही बाजूकडील गटारे काढून पाणी जाण्यासाठी मार्ग करावा व रस्त्याची दुरूस्ती करावी. अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT