In the name of dispute resolution committee 
पश्चिम महाराष्ट्र

लेंगरेत कोरोनामुळे बैठका नाहीत; तंटामुक्ती समित्या नावालाच 

सचिन निकम

लेंगरे : परिसरातील तंटामुक्ती समिती आता नावालाच उरल्या आहेत. कोरोनामुळे बैठकाही होत नाहीत. गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांनी तंटा मुक्त अभियान सुरू केले. सुरवातीच्या काळात तंटा मुक्ती अभियानाला चांगले दिवस आले होते. सर्व गावात तंटामुक्ती समिती स्थापन झाल्या. परंतु त्यानंतर या अभियानाला मरगळ आली आहे. 

या समित्याचे पोलिस प्रशासनाकडून प्रबोधन केल्यास पुन्हा या समित्यांना अच्छे दिन येण्यास वेळ लागणार नाही. मात्र पोलिस प्रशासनाकडूनच अभियान दुर्लक्षित ठरू लागल्याने गावातील तंट्यात वाढ झाली आहे.  अभियानाच्या सुरवातीला काही दिवस तंटामुक्ती समित्यांचे काम चांगले सुरू होते. गावातील तंटे बैठका होऊन अनेक तंटे गावातच मिटवण्यात समित्यांना यश येत होते. त्यामुळे पोलिस स्टेशन पर्यंत तक्रारी जाण्याचे प्रमाण घटले होते. 

65 गावांपैकी बासष्ट गावांना शासनाची बक्षिसेही मिळाली. आता मात्र या तंटामुक्ती समित्यांला मरगळ आली आहे. अनेक गावांच्या समित्यात राजकारण्याचा शिरकाव झाल्याने बैठकांना विरोधकांची आडकाठी सुरू झाली आहे. लॉकडाऊन बरचशी मंडळी गावी आली होती. या काळात गावातील शेतीवाडी त्या संबंधित कामास सुरवात केली. मात्र गावातील बरेच दिवस शांत असलेले तंटे वाढीस लागले यातच तंटामुक्तीच्या अध्यक्षाकडून होत असलेल्या राजकारणामुळे वाद चांगलेच चव्हाट्यावर आल्याने कोरोना काळातही सामान्य लोकांना पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवावे लागले होते.

यातच ज्या गावात हे अभियान सुरू आहे त्या गावात कोरोनामुळे ही बैठका होत नसल्याने आता किरकोळ तक्रारी मिटवण्यासाठी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पूर्वीचा तंटामुक्ती समिती रद्द करून नवीन समिती शासनाने निवडाव्यात अशी अनेक गावांतील ग्रामस्थांची मागणी होत आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Hotel Fire : साखरझोपेत असतानाच मृत्यूने गाठले ! पहाटे हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

Chhatrapati Sambhajinagar Car Fire: जॅमर लावलेल्या कारला अचानक आग; छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरातील घटनेने खळबळ

झोपेतच घेतला अखेरचा श्वास! बॉलीवूड अभिनेत्रीचं २७ व्या वर्षी निधन, महिन्याभराने कुटुंबाने दिली माहिती

Marathi News Live Updates : पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा दुग्धशर्करा योग; त्र्यंबकेश्वरला भाविकांची अलोट गर्दी

१७ ऑगस्ट पंचांग! नागपंचमीसह श्रावणी सोमवार; जाणून घ्या शुभ-अशुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT