nana patole criticize government Again threat of crisis hit farmer politics eSakal
पश्चिम महाराष्ट्र

Nana Patole : राज्यात सुलतानी सरकार; अन्नदाता शेतकऱ्यावर पुन्हा संकटाचे सावट - नाना पटोले

तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येऊ नये, असे साकडे घातल्याचे सांगितले

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : जून संपत आला तरी राज्यात पाऊस नाही. पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. अनेक समस्यांना सामोरे जात असलेल्या अन्नदाता शेतकऱ्यावर पुन्हा संकटाचे सावट आहे. सांगूनही काही ऐकले जात नाही. राज्यातील सरकार सुलतानी आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केली.

त्यांनी येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येऊ नये, असे साकडे घातल्याचे सांगितले. कोरोनानंतर राज्यात घटनाबाह्य सरकार आले. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. राज्यात भ्रष्टाचारी यंत्रणा उभी राहिली आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही सूचना पाळून शेतकऱ्यांची अपेक्षापूर्ती केली होती. खोटे बोलणे आणि मूळ प्रश्नांना बगल देणे, ही त्यांची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT