पश्चिम महाराष्ट्र

नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी खुले

सकाळ वृत्तसेवा

नृसिंहवाडी - येथील श्री दत्त मंदिर आज दहा दिवसानंतर दर्शनासाठी खुले झाले आहे. कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी आज ओसरली. पावसानेही उसंत घेतल्याने व आज पाैर्णिमेमुळे भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

कृष्णा नदी पात्रातील पाणी कमी झाले आहे. आज पाण्याचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे होता. अशा स्थितीला दक्षिणद्वार साेहळा असे म्हणतात. आज सायंकाळी हा दक्षिणद्वार सोहळा दत्तमंदिरात संपन्न झाला. दक्षिणद्वार सोहळा व पौर्णिमा याचा हा योग भक्तांसाठी पर्वणीच ठरला. या निमित्ताने अनेक भाविकांनी स्नानाचा लाभ घेतला. स्नानासाठी कोल्हापूर, मिरज, सांगलीसह कर्नाटक, कोकण या ठिकाणाहून भाविक आले होते.

गेल्या दोन महिन्यात दत्तमंदिर आणि नृसिंहवाडी परिसरामध्ये तीन वेळा महापूर येऊन गेला. यामुळे दत्तमंदिर आणि मिठाई व्यापाऱ्यांची दुकाने पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. प्रलयामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. चार दिवसापासून आम्ही सर्व व्यापारी पुन्हा नव्या जोमाने मिठाई तयार करत आहोत. व्यापाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. आज पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक भाविकांनी नारळ प्रसाद घेतला. पुन्हा सर्व सुरळीत होऊ लागल्याने आज आम्हाला खूप आनंद होत आहे.

- सुनील धनवडे,

मिठाई व्यापारी, नृसिंहवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Dravid Son Samit Dravid: राहुल द्रविडच्या मुलाने मैदानात घातला धुमाकूळ; 360° फटकेबाजीचा VIDEO व्हायरल

Land Acquisition: २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा! भरपाईवाढीच्या दाव्यांवर सहा महिन्यांत निर्णयाचे उच्च न्यायालयाचे आदेश

Amboli Waterfall : 'प्रति महाबळेश्वर' आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित! फेसाळणारे पाणी अन् दाट धुक्याचा थरार अनुभवण्यासाठी गर्दी; गोवा-कर्नाटकातूनही पर्यटकांची पावले वळली

Sillod News: सिल्लोडमध्ये खळबळ! डोंगरावर केमिकलच्या टाक्या टाकून पेटवल्या; उग्र वासाने नागरिकांमध्ये भीती, धोक्याची शक्यता..

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT