पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीत फेरबदलाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा

सातारा : पक्षात पत असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच आगामी काळात पक्ष संघटनेची पदे दिली जावीत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांपुढे केली. पक्षाशी प्रामाणिक राहून पक्ष संघटना वाढीसाठी झटणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच यापुढे प्रदेश पातळी, शासकीय समित्या व महामंडळांच्या नियुक्तीत स्थान मिळेल, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज स्पष्ट केले.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनात सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या वेळी सारंग पाटील, दीपक पवार, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, निवास शिंदे, अतुल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्यांदाच राष्ट्रवादी भवनात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यामुळे सर्वांच्या मनात समाधानाचे वातावरण होते. यापूर्वींच्या पक्षाच्या बैठकीत जवळच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाच बोलण्यास दिले जात होते. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी हा पायंडा बदलल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. श्री. पाटील यांनी तालुकानिहाय अध्यक्षांशी चर्चा करून तालुका कार्यकारिणी, बूथ समिती, बूथ अध्यक्ष यांच्या निवडी झाल्या आहेत का? तालुक्‍यात काम करताना कोणत्या कोणत्या समस्या तुम्हाला येत आहेत, याची माहिती जाणून घेतली. बहुतांशी सर्वच तालुकाध्यक्ष व विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांनी यापुढे पक्षात पत असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच पक्ष संघटनेची पदे दिली जावीत, अशी भावना व्यक्त केली. 

सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, ""यापुढे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहून पक्ष संघटना वाढीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनाच विविध पदांवर काम करण्यासाठी संधी दिली जाणार आहे, तसेच प्रदेश संघटना, शासकीय समिती व महामंडळांच्या नियुक्‍त्या आगामी काळात होणार आहेत. त्या वेळीही हाच निकष ठेवला जाईल.'' 

हेही वाचा : बाप हो देव पाहिला का देव ?

महिला आघाडीत फेरबदलाची शक्‍यता 

राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळावी म्हणून चार महिला पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे अर्ज केला आहे. यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव यांच्यासह कार्याध्यक्षा कविता म्हेत्रे, जयश्री पाटील, सीमा जाधव यांचा समावेश आहे. महिला आघाडीत असलेली धुसफूस लक्षात घेऊन आघाडीत फेरबदल होण्याचे संकेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT