Politics 
पश्चिम महाराष्ट्र

भाजपची रणनीती आघाडीवर

श्रीकांत कात्रे

सातारा - गटबाजीमुळे सातत्याने निर्माण होणाऱ्या पेचात गुंतलेली राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा नेतृत्वाअभावी काँग्रेसमध्ये आलेली मरगळ, पालकमंत्रिपद असूनही ‘व्हिजन’ नसलेली शिवसेना अशी स्थिती असताना स्वतःची कोणतीच ताकद नसलेल्या भारतीय जनता पक्षाने मात्र जिल्हा पोखरून काढत शांतपणे डावपेच करीत आपली रणनीती स्पष्ट केली आहे.

जिल्ह्यातील आठपैकी सात मतदारसंघांतील उमेदवार भाजपने जवळजवळ निश्‍चित केले असून साम, दाम, दंड, भेद साऱ्या नीतींचा अवलंब करीत आगामी निवडणुकीची व्यूहरचना गतिमान केली आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात कागदावर प्राबल्य आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि पक्षाच्या आमदारांमध्ये असलेल्या सख्ख्यामुळे पक्षापुढे अनेक प्रश्‍नचिन्हे आहेत. लोकसभा आणि विधानसभा उमेदवारीचा मेळ कसा घालायचा, याच्याच विवंचनेत जिल्ह्यातील नेते गुंतून पडले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव मोठे असले तरी जिल्ह्यातील काँग्रेसचे संघटन विस्कळितच नव्हे तर दुबळे झाले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे आणि शिवसेनेतील काही गटांचे मतभेद जगजाहीर आहेत. श्री. शिवतारे यांना जिल्ह्यात यायला सवडही मिळत नाही आणि ते पक्षबांधणीकडे लक्षही देत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी मात्र शिस्तबद्धपणे संघटन आणि निवडणुकीची व्यूहरचना गतिमान केली आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आदी प्रमुखांनी सातत्याने संपर्क ठेवत जुळणी सुरू ठेवली आहे. या पक्षातही गटबाजी आहेच. मूळ कार्यकर्ते आणि पक्षाबाहेरून येऊन तिखट होणारे असा छुपा वाद या पक्षातही आहे. दोन्ही काँग्रेसच्या बलाढ्य नेत्यांसमोर मूळ कार्यकर्ते टिकू शकत नसल्याने इतर पक्षांतून येणाऱ्यांवरच पक्षाची भिस्त आहे. सातारा, कऱ्हाड (दक्षिण) व (उत्तर), माण, कोरेगाव, वाई व पाटण या मतदारसंघांतील उमेदवार जवळजवळ निश्‍चित करून त्या त्या मतदारसंघात भक्कम मोर्चेबांधणी पक्ष करीत आहे. दोन्ही काँग्रेसचे नेते कोणते डावपेच खेळतील, त्यावर गणिते अवलंबून असली तरी त्यांचीच ताकद घेऊन भाजप आघाडी घेण्याची तयारी करीत आहे.

साखर पेरणी ठरतेय महत्त्वाची...
चंद्रकांत पाटील यांच्या जाहीर दौऱ्यांपेक्षा गोपनीय पद्धतीने होणारे दोरे वाढले आहेत. अनेक ठिकाणी नेता-कार्यकर्ता आपल्याकडे वळविण्यासाठी सामोपचाराचे प्रयत्न सुरू आहेत. जलसंधारणासारख्या कामांमध्ये आर्थिक मदतीची ग्वाही दिली जात आहे. काही पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते ‘मोका’च्या तडाख्यात सापडू लागले आहेत. निधी मिळण्यातील भेदाभेदही उघड होत आहे. पक्षाध्यक्ष शहा यांच्या ‘बूथनिहाय’ कार्यकर्त्यांची जोडणीही सुरू आहे. कागदावर काहीही ताकद न दिसणाऱ्या भाजपची पेरणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगासाठी 'ही' तारीख महत्त्वाची; कर्मचाऱ्यांना होणार दुप्पट फायदा

Latest Marathi News Live Update: कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्याचा विवस्त्र व्हिडिओ व्हायरल

INDW vs SAW: भारताची 'संकटमोचक' ऋचा घोषचं शतक ६ धावांनी हुकलं, पण नावावर झाले ३ मोठे विक्रम

Israel announces Gaza ceasefire : ‘’२४ तासांच्या आत गाझामध्ये युद्धबंदी’’ ; अखेर इस्रायलने केली मोठी घोषणा!

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! महागाई भत्त्यामध्ये तब्बल ८ टक्के वाढ

SCROLL FOR NEXT