khanderao jadhav.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा नगरसेवक खंडेराव जाधवला अटक...आता चार दिवस पोलिस कोठडीत मुक्काम 

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली)-इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्यावर त्यांच्या केबिनमध्ये जाऊन धमकी देणारा राष्ट्रवादीचा स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव याला इस्लामपूर पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे. त्यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस वगळता इतर सर्वपक्षीय स्तरातून दबाव वाढत चालला होता. आज अटकेनंतर त्याला येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

मुख्याधिकारी यांना केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडेराव हा पसार झाला होता. त्याचा इस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयातील अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर तो उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती होती. दरम्यान त्यापूर्वीच इस्लामपूर पोलिसांनी आज पहाटे त्याला अटक केली. 


मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना मारण्याचा प्रयत्न व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात आठवड्यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये असलेल्या बियर बारमधून कचरागाडीतून दारूची वाहतूक केल्याची घटना घडली होती. त्यानंतर जाधव याने मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्यावर केबिनमध्ये जाऊन त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची पवार यांची तक्रार आहे. शिवाय खुर्ची घेऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हटले आहे.

जाधव याच्यावर यापूर्वीही मारामारी, खुनाचा प्रयत्न यासह इतर गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांनाही त्याने धमकी दिली होती. नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यात पसार झालेल्या खंडेरावला अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT