Ajit Pawar vs Jayant Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

NCP Crisis : अजितदादा फक्त 'मामा', आमचे नेते जयंतरावच; मुंबईतील 'त्या' भेटीवर महापौरांचं तातडीनं स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुंबईत घेतलेली भेट ही वैयक्तिक कामासाठी होती.

सकाळ डिजिटल टीम

अजितदादांच्या गोटात यापूर्वीच नगरसेवक योगेंद्र थोरात आणि अतहर नायकवडी यांनी प्रवेश केला आहे.

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुंबईत घेतलेली भेट ही वैयक्तिक कामासाठी होती, असे स्पष्टीकरण महापौर दिग्विजय सूर्यवंशी (Digvijay Suryavanshi) यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) झालेल्या फुटीनंतर जिल्ह्यातील कोण नेते कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात असताना सूर्यवंशी यांची ‘ती’ भेट चर्चेची ठरली होती. याबाबत त्यांनी महापालिकेत पत्रकारांसमोर स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, ‘‘आमचे कुटुंब शेतकरी कामगार पक्षातील. मी त्या पक्षात साधा कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यानंतर आमचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम सुरू केले. त्यांनीच मला संधी दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही यापुढेही कार्यरत राहू.

मुंबईतील दोन्ही गटांच्या मेळाव्यावेळी मला अजितदादा पवार यांच्या गटाकडूनही निमंत्रण होते. मात्र, आम्ही सर्व नगरसेवक स्पष्ट भूमिका घेत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मेळाव्यास उपस्‍थित होतो. मेळाव्यानंतर मी माझ्या वैयक्तिक कामासाठी अजितदादांची भेट घेतली. ते माझे जवळचे नातलग आहे. नातेसंबंध आणि राजकारण यात गल्लत करता कामा नये, अशी शिकवणच आम्हाला शरद पवार यांनी दिली आहे.

त्यामुळे आम्ही ठामपणे यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत राहू. माझ्या मनात किंतू-परंतु काहीच नसल्यामुळेच मी जाहीर उघडपणे अजितदादांची भेट घेतली. मात्र त्याचा गैरसमज पसरवण्यात आला. त्याबद्दल मी आज नेते जयंत पाटील यांच्याकडेही माझी भूमिका मांडली आहे.’’

अजितदादांच्या गोटात यापूर्वीच नगरसेवक योगेंद्र थोरात आणि अतहर नायकवडी यांनी प्रवेश केला आहे. माजी महापौर इद्रीस नायकवडी यांनी सर्वांत आधी अजितदादांची भेट घेत अभिनंदन केले. त्यानंतर थोरात यांचे बंधू बीरेंद्र थोरात यांनी मुंबईत तळ ठोकला आहे. नायकवडी यांच्या गोटातून जिल्ह्यातील अनेकजण संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

महापौरांची ‘ती’ भेट वैयक्तिक असली तरीही त्याची चर्चा होणार, गृहितच होते. दिवसभर समाजमाध्यमांवरून चर्चा होती. महापौर दिवसभर फोनवरून खुलासे करण्यात व्यस्त होते. दिवसभर ते महापालिकेत थांबून होते. सायंकाळी त्यांनी पक्षप्रतोद मैन्नुद्दीन बागवान यांच्यासह नगरसेवकांसमवेतही चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT