N.D.Patil react on Bhimashankar Patil the self proclaimed president of the Karnataka Navnirman Sena in Karnataka marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

लोकांना गोळ्या घाला म्हणणारा हा कोण ? प्रा.एन.डी.पाटील खवळले...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, मीच गेली 60 वर्षे या चळवळीत काम करत आहे. जेव्हा हा लढा सुरू झाला, त्यावेळी महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यात उड्या घेतल्या. सद्या हा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना या लढ्यातील लोकांना गोळ्या घाला म्हणणारा हा कोण ? त्याची जनतेतील पत काय? अशा धमक्‍यांना आम्ही भीक घालणार नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी कर्नाटकातील कर्नाटक नवनिर्माण सेनेचा स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील याचा समाचार घेतला. 

धमकी देणाऱ्या महाशयाची पत काय? 

भीमाशंकर पाटील याने काल महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाबाबत बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यासंदर्भात डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. हा महाशय कोण, त्याची समाजातील पत काय? अशी खिल्ली उडवून डॉ. पाटील म्हणाले, "असे बोलणाऱ्या व्यक्‍तीला हा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे याची कल्पना आहे की नाही मला माहित नाही. त्याच्या या बोलण्याने काय साध्य करायचे आहे माहीत नाही, पण सीमाप्रश्नातील नेते या धमकीला काडीइतकीही भीक घालणार नाहीत. न्यायालय गोळ्या घालण्याचा निकाल देणार नाही. त्याचं डोकं ठिकाणावर आहे का? या धमकावणीने हा लढा यत्किंचितही मागे जाणार नाही. ही भाषा कुठल्याही संघटनेच्या नेत्याला शोभणारी नाही.' 

लढा सुरूच राहील 

यापूर्वीही अनेक नेत्यांनी आपली वक्तव्य केली. मात्र त्याचा काहीही परिणाम लढ्यावर झाला नाही, होणार नाही. मी या वक्‍त्यव्याचा निषेध करतो. सीमावासीय अशा वक्तव्याने जराही भांबावणार नाहीत. मराठी जनतेने याकडे लक्ष देऊ नये. आपल्या मर्यादा न ओळखता विधान करणाऱ्या या महाशयाने सीमाप्रश्‍नावर किती अभ्यास केलाय हा प्रश्न आहे. असे भीमाशंकर कित्येक येतील पण हा लढा चालूच राहील, असे प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT