पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत NDRF च्या तीन तुकड्या दाखल, रेस्क्यू ऑपरेशनला सुरवात

शैलेश पेटकर-सकाळ वृत्तसेवा

सांगली : कृष्णा नदीच्या (Krushna River) पातळीत ५५ फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सांगली शहराच्या निम्म्या भागात महापुराचे पाणी शिरले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराच्या तीन तुकड्या दाखल झाल्या आहेत. रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात झाली आहे. शंभर फुटी रस्ता, शामरावनगरसह उपनगरात बचाव कार्याला जोमात सुरूवात झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी (Collector Dr. Abhijeet Chaudhary) यांनी रेस्क्यू (Rescue) ऑपरेशनची पाहणी केली.

शंभर फुटी रस्त्यावरून रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात झाली असून शामरावनगरसह परिसरात अडकलेल्या नगारिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात येत आहे.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून आयर्विनच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. काल मध्यरात्रीपासून ५५ फुटांवर पाणी पोहचले. यामुळे कोल्हापूर रस्ता, शामरावनगर, पाकिजा मश्‍जिद परिसर, सांगलीवाडी, बायपास रस्ता परिसरात पाणी आले आहे. तेथे अडकलेल्या नागरिकांना बचावासाठी लष्कराच्या तीन तुकड्या दाखल झाल्या आहे.

शंभर फुटी रस्त्यावरून रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात झाली असून शामरावनगरसह परिसरात अडकलेल्या नगारिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात येत आहे. दुपारी बाराच्या सुमारास बचाव कार्यास सुरूवात झाली. स्थानिकांच्या मदतीने लष्कराच्या जवानांकडून बोटीने नागरिकांना सुरक्षितस्थळी नेले जात आहे. सुरक्षितस्थळी नेल्यानंतर प्राथमिक वैद्यकीय तपासणीही केली जात आहे. तब्बल तीन तुकड्या दखल झाल्याने बचाव कार्यास वेग आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी मोहीमची माहिती घेतली. लष्करास लागेल ती मदत प्रशासनाकडून केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुणे पोलिस आयुक्तालयात दोन नवीन परिमंडळे, पाच नवीन पोलिस ठाणी मंजूर!

IND vs SA: बुमराहपाठोपाठ हार्दिकचीही खास सेंच्युरी! 'असा' पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय ऑलराऊंडर

Maharashtra Sand Mafia: वाळू माफियाविरोधात मोठी कारवाई लवकरच! मुख्यमंत्र्यांचे ठाम आश्वासन, काय म्हणाले?

Who Is Nitin Nabin: दिल्लीच्या राजकारणात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन कोण?

Lionel Messi: मेस्सीसाठी स्वागत, पण भारतीय खेळाडूंची ओळख पुसली! भारतीय फुटबॉलसाठी धक्कादायक क्षण

SCROLL FOR NEXT