wadgaon 
पश्चिम महाराष्ट्र

धनगर समाजातील सर्व पोट जातींनी एकत्रित लढा देण्याची गरज 

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर - राजकारणाचे जोडे बाजुला ठेउन धनगर समाजाच्या विविध पोटजातीमधील सर्वांनी एकत्र या. एकीचे बळ आपल्याला पुढे घेउन जाईल असे मत आमदार दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले. 

शेगर धनगर समाजाच्या राज्य अध्यक्षपदी सुनिल भगत यांची निवड झाली याबद्दल नुतन पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार समारंभ कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे ग्रामस्थांनी आयोजित केला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भरणे बोलत होते. 

भाजपा राज्य उपप्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गावडे, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी जि. प अध्यक्ष संपत देवकाते, शामराव काकडे, रामचंद्र भगत, छगन आटोळे, डॉ. विजय कोकणे, शिवलाल गावडे, महादेव गावडे उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या समाजाचे संगठण करणे गरजेचे आहे. पण दुसऱ्या समाजाचा दुस्साहस नको, धनगर आणि धनगड महाराष्ट्रात एकच आहेत. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागणीनुसार सरकारने कोर्टाला सर्टिफिकेट दिले आहे. 

यामुळे एसटीचे आरक्षण मिळणार येत्या २७ तारखेला कोर्टात हेरींग आहे. याच वेळी कदाचीत आपल्या बाजुने निकाल लागु शकतो असे सुतोवाच भाजपा नेते बाळासाहेब गावडे यांनी बोलताना केले. सत्कारमुर्ती सुनिल भगत यांनी यापुढील काळात समाजातील सर्वसामान्य तरूण वर्गाला बरोबर घेउन त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगीतले. प्रास्तावीक डि. जी माळशिकारे यांनी आभार तानाजी मिंड यांनी मानले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

Talegaon Station News : १०० मीटरचे काम, वाहतूक मात्र दिवसभर जाम; चाकण एमआयडीसीतील भांबोली ते चाकण रस्त्यावर वाहतूक कोंडीचा शुक्रवार

GT vs RR Qualifier 2: वैभव सूर्यवंशीचे शतक थोडक्यासाठी हुकले... पठ्ठ्याने ५ विश्वविक्रमांसह राजस्थानला सावरले, गुजरातसमोर तगडे लक्ष्य

GT vs RR Qualifier 2: वैभव सूर्यवंशीचे ३ वर्ल्ड रेकॉर्ड्स! आंद्रे रसेलच्या नावावर असेलला विक्रम उद्ध्वस्त; जगात अव्वल नंबर कामगिरी...

Kaygaon News : ‘शेतकऱ्यांना न्याय द्या, रेकॉर्ड पारदर्शक तपासा’; जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

SCROLL FOR NEXT