Marathi-Lagna-Geet-Marathi-2018-20180430-500x500.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ना मेहंदी रंगली.. ना  सनई वाजली..थांबली एक परंपरा 

गणेश जाधव

दिघंची (सांगली) ः जर वर्षी येथे सनई, ढोल, बॅंजो चा आवाज घुमत असतो.. ते ठिकाण म्हणजे.. आटपाडी तालुक्‍यातील दिघंची.. शिवजयंती निमित्त येथे 11 वर्षापासून सामुदाईक विवाह सोहळा होत असतो. एकीकडे शिवजयंतीची धामधूम तर दुसरीकडे विवाह सोहळ्याचा मोठा गाजावाजा... सारा दिघंची परिसर गजबजून झातो. मात्र यंदा हा परिसर सामसुम बनला.. तो म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भावामुळे.. आणि तब्बल 11 वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे.

यंदाचा शिवजयंती व सामुदाईक विवाह सोहळा रद्द झाला. 
कोरोनाच्या प्रादुभावाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे येथील शिवजयंती अत्यंत साधेपणाने सोशल डिस्टनचे पालन करीत प्रतिमापुजन करून केले.

तर जयंतीनिमित्त होणारा सामुदाईक विवाह सोहळा रद्द करण्यात आल्याचे माहिती शिवप्रतिष्ठानचे सोपानराव काळे यांनी दिली.दिघंची शिवजयंतीचे वेगळे वैशिष्ट्य आहे. 1989 मध्ये स्थापन झालेले क्रांती गणेश तरुण मंडळ व 30 वर्षे सामाजिक उपक्रमत आघाडीवर आहे. त्यातच हा शिवजयंती सोहळा ग्रामस्थ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. समाजाला दिशा देणारे कार्यक्रम व व्यख्याने घेतली जातात. 

या शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या सामुदाईक विवाह सोहळ्यात दोनशे च्या वर वऱ्हाडी लोकांना अन्नदान केले जाते. दरम्यान 11 वर्षापासून सुरू असलेली सामुदाईक विवाह सोहळा कोरोनामुळे खंडीत झाला आहे. 


आत्ता पर्यंत शिवजयंती निमित्त घेत असलेल्या सामुदाईक विवाह सोहळ्यात 200 च्या वर शुभमंगल वऱ्हाडीना मोफत अन्नदान करून झाले. तर 60 जोडप्यांना अनुदानाचा लाभ मिळवून दिला 

सोपानराव काळे, 
संस्थापक क्रांती गणेश तरुण मंडळ 


लॉक डाऊन मुळे शिवजयंती प्रतिमाबापूजन करून साजरी केल्याने जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या 11 वर्षाची सामु दाईक विवाह सोहळ्याची परंपरा खंडित झाली 

धीरज मोरे ,शिवप्रतिष्ठान कार्यकर्ता 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT