New talukas in Belgaum district 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव जिल्ह्यातील नवे तालुके परिपत्रकात कधी?  

संजय साळुंखे

निपाणी : बेळगाव जिल्ह्यात निपाणी, कागवाड, मुडलगी कित्तूर, तर बिदर जिल्ह्यात कमालनगर, हुलसूर या नवीन तालुक्‍यांची निर्मिती २०१८-१९ मध्ये झाली आहे. भालकी तालुक्‍यातील काही गावे हुलसूरला जोडली आहेत. पण, महाराष्ट्र शासनाने आपला हक्क सांगितलेल्या सीमाभागातील ८६५ गावांच्या परिपत्रकात नव्या तालुका रचनेनुसार बदल केलेला नाही. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील सेवा-सुविधा, सवलतींपासून येथील मराठी भाषक वंचित राहण्याचा धोका आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात यावर चर्चा करून परिपत्रकात बदल करण्याची मागणी नव्या तालुक्‍यांतील मराठी भाषक करत आहेत.

महाराष्ट्र शासनाने कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांवर दावा सांगून त्यांचे जिल्हा व तालुकावर परिपत्रक १० जुलै २००८ रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार व शासनाच्या उपसचिवांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध केले आहे. या ८६५ गावांतील मराठी भाषक उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवरील नियुक्तीसह व अन्य लाभासाठी हे परिपत्रक आवश्‍यक आहे. पण, बेळगाव जिल्ह्यात निपाणी, कागवाड तर बिदर जिल्ह्यात कमालनगर व हुलसूर या नवीन तालुक्‍यांची निर्मिती झाली आहे. परिणामी, महाराष्ट्र शासनानेही नव्या तालुका रचनेनुसार परिपत्रकात बदल करण्याची गरज आहे. बदल न झाल्यास सीमाभागातील मराठी भाषक उमेदवार भविष्यात महाराष्ट्रातील सेवा-सुविधा व सवलतींपासून वंचित राहू शकतात.

सध्याच्या परिपत्रकात जिल्हा व तालुकावार ८६५ गावांची विभागणी झालेली आहे. त्यात बेळगाव जिल्ह्यातील ३८५, कारवारमधील नवे तालुके परिपत्रकात कधी? 


२९९ आणि बिदरमधील १८१ गावांचा समावेश आहे. नवीन तालुक्‍यांच्या निर्मितीमुळे काही गावांचे तालुके बदलले आहेत. या बदलाची दुरुस्ती महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात होणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्राच्या परिपत्रकात अथणी तालुक्‍यातील ९ गावांचा समावेश आहे. आता त्यातून कागवाड हा नवीन तालुका झाल्याने ९ पैकी ३ गावे या तालुक्‍याला जोडली आहेत. चिक्कोडी तालुक्‍यातील ४८ गावांचा परिपत्रकात समावेश आहे. निपाणी तालुका झाल्याने ४८ पैकी तब्बल ३८ गावे निपाणी तालुक्‍यात समाविष्ट झाली आहेत. बिदच्या औराद, कमालनगर, बसवकल्याण, भालकी तालुक्‍याबाबतही परिपत्रकात बदल करावा लागणार आहे. 
 
परिपत्रकात अशी हवी ८६५ गावांची जिल्हा व तालुकानिहाय विभागणी
 
कारवार जिल्हा
तालुका*गावांची संख्या
कारवार*५० 
सुपा*१२६ 
हल्याळ*१२३ 
एकूण*२९९
 
बिदर जिल्हा
तालुका*गावांची संख्या
बसवकल्याण*३०
कमालनगर*५६ 
भालकी*५४ 
औराद (संतपूर)*२६
हुलसूर*०८ 
एकूण*१७४ 
 
गुलबर्गा जिल्हा
तालुका*गावांची संख्या
आळंद*०७ 
एकूण*०७
 
संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT