the new trend of food of poultry house businessman in sangli it's easy to businessman 
पश्चिम महाराष्ट्र

पोल्ट्री व्यवसायात पक्षाच्या खाद्यात नवा ट्रेड ; पैशाची होतीये बचत

सकाळ वृत्तसेवा

लेंगरे (सांगली) : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कडधान्याच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचे बजेटच पुरते कोलमडले आहे. त्यामुळे लोकांनी खिशाला परवडेल अशी खाद्यसंस्कृती अवलंबण्यास सुरवात केली आहे. यामध्ये दैनंदिन खाद्यात बद्दल करत जंक फूड्‌स खाण्यास सुरवात केली. अशीच काहीशी स्थिती पोल्ट्री व्यावसायिकांनी झाली आहे.

मका दरवाढीचे वेळी कमी दराने मिळणारी काळी ज्वारी, तांदळाची कणीचा वापर करीत आहेत. खाद्यातील प्रमुख असा असणारा घटक शिंपल्याऐवजी मार्बल चिप्सचा वापर केला जात आहे. सतत कच्च्या मालात होत असलेल्या खाद्याच्या दरवाढीने अडचणीत असणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांनी खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले आहेत. पोल्ट्री व्यवसायातही खाद्यात नवीन ट्रेड आल्यामुळे पैशाची बचत होऊ लागल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहेत.


पोल्ट्रीत पक्षाच्या खाद्यात प्रामुख्याने मका, शिंपला, माश्‍याचे बारीक केलेले खाद्य हा कच्चा माल वापरून खाद्य तयार केले जाते. त्यातील एक शिंपला आहे. शिंपल्याचा दर सध्या आठ रुपये किलो दर आहे. मार्बल चिप्स दोन रुपये किलो दराने मिळत आहे.पोल्ट्री कोंबड्यांना शिंपल्या इतकाच मार्बल चिप्स मधून कॅल्शियम मिळतो. पोल्ट्री खाद्य शिंपला किंवा मार्बल चिप्स दहा टक्के वापर करण्याचे प्रमाण आहे. 

अंडी दर घसरणीच्या वेळी  अंडी उत्पादनाचा मेळ घालण्यासाठी व्यावसायिक पर्याय शोधत आहेत.  पोल्ट्री खाद्यतमार्बल चिप्समधून कोंबड्यांना पुरेसे न्यूट्रिशन मिळत  असले तरी शिंपला याचाच वापर पोल्ट्री व्यावसायिकांनी करणे योग्य आहे. बाळकृष्ण हॅचरी डॉक्‍टरएस. ए. काकडे 
यांनी सांगितले. पोल्ट्री खाद्य  शिंपल्याऐवजी मार्बल चिप्सचा वापर करीत आहेत. एक क्विंटल खाद्याच्या पाठीमागेसाठ रुपयाची बचत होत आहे. अंड्याला दर पडल्यास मार्बल चिप्स वापरल्याने खाद्यातील खर्च कमी होण्यास हातभार लागत असल्याचे पोल्ट्री व्यावसायिक केदारी भारते यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

US Iran Conflict : मोठा दिलासा ! गॅस तुटवड्याचं संकट टळणार, इराणने भारतासाठी खुली केली होर्मुझची सामुद्रधुनी

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT