new Visitors to the solar system; The alluring vision of Comet NeoWise
new Visitors to the solar system; The alluring vision of Comet NeoWise 
पश्चिम महाराष्ट्र

सूर्यमालेत आलाय आगंतुक पाहुणा; "कॉमेट निओवाईज'चे विलोभनीय दर्शन

शंकर शेलार, सांगली.

गेले काही महिने एक आगंतुक पाहुणा आपल्या सूर्यमालेत प्रवेशला आहे. 'नासा'च्या "निओवाईज' या अधोरक्त किरणांच्या दुर्बिणीने त्याला खूप दूरवर असतानाच 27 मार्च 2020 रोजी हेरला आणि त्याच नामकरण सुद्धा केलं. सी/ 2020 एफ3 याला कॉमेट निओवाईज (Neowise) म्हणूनही ओळखतात. 

"निओवाईज सी/ 2020 एफ3' हा धूमकेतू मंगळवार ता. 14 जुलैपासून संध्याकाळी वायव्य दिशेला क्षितिजावर सप्तर्षी या तारका समूहात दिसणार आहे. तो दररोज क्षितिजापासून थोडा थोडा वरती, सप्तर्षीकडे सरकताना दिसेल. 23 जुलै रोजी तो पृथ्वीच्या निकट सुमारे 10 कोटी किमी अंतरावर असेल. यापुढे 20 दिवस याचे दर्शन घडेल मात्र तो क्षितिजावर असलेने सुर्यस्तानंतर फक्त 20-25 मिनिटेच तो दिसेल. याच्या केंद्रकाचा व्यास पाच किमी आहे.

मात्र त्याला कोट्यवधी किलोमीटरची शेपटी फुटल्यामुळे तो एखाद्या पुच्छल ताऱ्यासारखा, कुंचल्यासारखा दिसेल. त्याची दृश्‍यप्रत मॅग्निट्यूड एक असल्याने केवळ डोळ्यांनी तो पहिल्या प्रतीच्या ताऱ्याप्रमाणे ठळक दिसेल. हा धूमकेतू पाहण्यासाठी उपकरणांची आवश्‍यकता नाही. पण बायनोकुलर / दुर्बिणीतून पाहिल्यास विलोभनीय नजरा या अनुभवता येईल. 1997 साली हॅले बॉपचा धूमकेतू ठळक दिसला होता. त्यानंतर तसाच तेजस्वी धूमकेतू पाहण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. याची कक्षा प्रदीर्घ-लंब-वर्तुळाकार असलेने हा 6766 वर्षांनी पुन्हा सूर्याच्या भेटीसाठी येईल. 

सूर्य, पृथ्वी अंतराच्या लाखोपट दूरवर अंतराळात oort cloud नावाचा सूर्यमालेला लपेटलेला ढग आहे. त्यामध्ये बर्फ, धूळ आणि कार्बनडाय ऑक्‍साईड वायूचे असंख्य गोळे फिरत असतात. त्यातील एखादा गोळा वाट चुकून सूर्याच्या गुरुत्वाकर्षणात सापडतो आणि त्याला प्रदक्षिणा घालू लागतो. तो जेव्हा सूर्याच्या सानिध्यात येतो तेव्हा सौर वातामुळे त्यास शेपटी फुटते. तेव्हा हा पाहुणा एखाद्या पुच्छल ताऱ्यासारखा दिसू लागतो. 

आजपासून आकाशात गुरू ग्रहाची प्रतियुती opposition घडत आहे. त्यामुळे गुरुचे दर्शन आता रात्रभर होईल शिवाय त्याचा आकार नेहमी पेक्षा मोठा आणि तेज वाढलेले दिसेल. सूर्य मावळला की पूर्वक्षितिजावर गुरुचा उदय होईल. एक एक करत शनी, नेपच्युन, मंगळ, युरेनस, शुक्र, बुध असे सर्व ग्रह पहाटे पाचपर्यंत आकाशात दाखल होतील. असा हा खगोलीय ग्रहगोलांचा दुर्लभ नजरा सध्या पहाटे दिसतो आहे.

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT