Newborn girl child throw in Garbage miraj news 
पश्चिम महाराष्ट्र

काटेरी झुडपातून येत होता तिचा रडण्याचा आवाज...

सकाळ वृत्तसेवा

मिरज - शिवजयंतीच्या मावळतीलाच मिरज शहरात कुपवाड रस्त्यावर एका कचऱ्याच्या ढिगात प्लास्टिक पिशवीमध्ये गुंडाळून टाकलेले स्त्री जातीचे अर्भक मिळाले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे या बालकाचे प्राण वाचले.

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या बालकाच्या रडण्याचा आवाज ऋषिकेश महिंद्रकर यांना ऐकू आला. त्यानी बॅटरीचा प्रकाशात पाहिले असता काटेरी झुडपात कचऱ्यामध्ये या बालकाचा रडण्याचा आवाज ऐकून त्याने तातडीने ही प्लास्टिकची पिशवी बाहेर काढली. यावेळी बालकाला तांबड्या मुंग्यांनी वेढले होते. याच मुंग्यांच्या चाव्यामुळे बालकाचा आक्रोश सुरू होता. त्याने तातडीने ही घटना पोलिसांना कळवली. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी स्वतः घटनास्थळी येऊन बालकास उचलून घेतले. आणि तातडीने शासकीय रुग्णालयात नेले.

बालकाला सांभाळण्याची जबाबदारी पाठक अनाथालयावर

सध्या बालक रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असले तरी त्याची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. दरम्यान हे बालक अशा अवस्थेत बेजबाबदारपणे फेकून देणा-या व्यक्तीचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत. या बालकाला सांभाळण्याची जबाबदारी जिल्हा बालकल्याण समितीने येथील पाठक अनाथालयावर सोपवली आहे. या अनाथालयाचे कर्मचारी सध्या रुग्णालयात या बालकाची काळजी घेत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अवघ्या १५ रुपयांत विकले जाताहेत अशोक खरातच्या अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ; खळबळजनक प्रकाराने संतापाची लाट

Career Numerology : राजयोग घेऊन जन्माला येतात 'या' 4 मुलांकाचे लोक; सरकारी नोकरीत मिळवतात यश, पण एक चूक बर्बाद करते आयुष्य

Latest Marathi News Live Update: हिंदू जनआक्रोश मोर्च्यात जाण्याआधी आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी अडवलं

Nashik Crime : सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा अड्डा उद्ध्वस्त; चौघांना बेड्या; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Ishwarpur labour: बांधकाम कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड! युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; ईश्वरपूर परिसरातील चित्र

SCROLL FOR NEXT