The Nimbalak-Borangaon road remained 3-4 feet due to encroachment 
पश्चिम महाराष्ट्र

निंबळक-बोरंगाव रस्ता अतिक्रमणामुळे राहिला 3-4 फुटाचा 

दिग्विजय साळुंखे

बोरंगाव : येथील निंबळक-बोरंगाव एक किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ' रस्त्यात खड्डा कि खड्डात रस्ता अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झाली आहे. दुतर्फा वाढलेल्या झाडाझुडपा च्या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी जबरदस्तीने केलेले अतिक्रमणामुळे वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून रस्ता न्यायालीन प्रक्रियेत अडकून पडला असून त्यावर प्रवास करणे अवघड झाले आहे. या रस्त्याचे दहा वर्षापूर्वी आर आर पाटील त्यांच्या प्रयत्नाने डांबरीकरण करण्यात आले होते.मात्र या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता डांबरी केला होता. निंबळक हद्दीतील 400 मीटरचे डांबरीकरण झाले नाही.

रस्त्याच्या बाजूच्या काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण, तक्रारीमुळे जवळपास गेल्या दहा वर्षापासून याचे काम रखडले आहे. नियमानुसार व शासन दरबारी असलेल्या नकाशाप्रमाणे रस्ता व्हावा, या मागणीसाठी सदर शेतकऱ्यांनी या कामासाठी अडथळा केला आहे. रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत, पावसाळ्यात चिखल, खड्ड्यातील पाणी ,रस्त्याच्या एका बाजूने मोठी झाडे, दोन्ही बाजूने उसाची शेती त्यामुळे बारा फुटाचा रस्ता चार ते पाच फूट शिल्लक राहिला आहे.

ग्रामपंचायतीने तात्पुरती सोय करून ऊस वाहतुकीसाठी रस्ता चालू करावा अशी शेतकरी वर्गात मागणी होत आहे. गावासाठी समंजसपणाची भूमिका नाही" ग्रामपंचायतीने अनेक वेळा रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना विचारपूस केली तात्पुरते खड्डे मुरमीकरण करून घेऊ या शिल्लक असलेल्या पाच ते सात फूट रस्त्यावर झाडे काढून मुरमीकरण करून ऊस वाहतूक करण्यासाठी रस्ता चालू करू या. तरीसुद्धा रस्त्याकडेची शेतकरी कामात अडथळा आणत आहेत. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT