Nine boats ready to face floods in Sangali 
पश्चिम महाराष्ट्र

महापुराचा सामना करण्यासाठी नऊ बोटी सज्ज, वाचा कुठे?

सकाळवृत्तसेवा

सांगली : संभाव्य पुरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेने नऊ यांत्रिक बोटी सज्ज ठेवल्या आहेत. या बोटींचे आज कृष्णा नदी पात्रात आयुक्‍त नितीन कापडणीस यांच्यासमोर प्रात्यक्षिक झाले. यंदा कृष्णा नदीला पूर आलाच तर सर्व बाजूंनी त्याला तोंड देण्यासाठी महापालिकेने काटेकोर नियोजन केले आहे. 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आजपासून आपत्कालीन यंत्रणा सक्रीय केली. आज सकाळी नदीपात्रात अग्निशामक विभागाच्यावतीने सज्ज करण्यात आलेल्या नऊ यांत्रिक बोटींचे प्रात्यक्षिक आणि तपासणी आयुक्त नितीन कापडणीस यांनी समक्ष केली. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

गतवर्षी महापुराने निम्मी सांगली कवेत घेतली होती. त्यामुळे यंदा पूर आलाच तर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि तत्परतेने मदत पोहोचवणे यासाठी आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज करण्यावर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी भर दिला आहे. यामध्ये यांत्रिक बोटी बरोबर, पुरबधितांसाठी तात्पुरता निवारा, जनावरांसाठी तात्पुरता निवारा यांचे नियोजन केले आहे. आयर्विन पुलाजवळ पाणी 25 फूटांवर जाताच नदीकाठच्या वस्त्यांमधील नागरिकांनी स्वत:हून स्थलांतरित होण्याबाबत सतत आवाहन केले जात आहे. 

आज महापालिकेच्या आणीबाणी सेवा विभागाकडील नऊ यांत्रिक बोटींचे प्रात्यक्षिक आणि साहित्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतली. अग्निशामक विभागाच्या तयारीचा आढावाही घेतला. कृष्णा नदीच्या माई घाटावर बोटींना नदीपात्रात घालून कर्मचाऱ्यांनी मदतीचे प्रात्यक्षिक केले. यावेळी आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त सहदेव कावडे, एस एस खरात, मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने, धनंजय कांबळे, किशोर कांबळे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT