पश्चिम महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा रुग्णालय येथे दाखल असणाऱ्या 4 अनुमानित व सातारा येथील खासगी दवाखान्यात दाखल असणार एक असे एकूण 5 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट एन. आय. व्ही. पुणे यांनी निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे.

आज (शनिवार) सातारा जिल्हा रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 24 वर्षीय पुरुष तर कृष्णा हॉस्पिटल कऱ्हाड येथे बाधीत रुग्णाच्या सहवासीत म्हणून 2 नागरिक व श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे एक नऊ महिन्याचे स्त्री जातीचे बाळ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व चार रुग्णांच्या घशातील स्त्राव पुणे एन. आय. व्ही. येथे पाठविण्यात आलेले आहेत. यापैकी नऊ महिने बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे. 

दरम्यन कृष्णा हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आलेल्या कोविडी -19 बाधीताच्या संपर्कात आलेल्या 41 पुरुष व 13 महिलांचे असे एकूण 54 अनुमानितांचे रिपोर्ट  एन. आय. व्ही. पुणे यांच्याकडून निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 
सातारा जिल्ह्यातील 21 मार्च रोजी अबुधाबी येथून प्रवास करुन आलेल्या 27 वर्षीय युवकाला सर्दी असल्याने शासकीय रुग्णालयात व 31 वर्षीय पुरुषाला श्वसन संस्थेचा तीव्र जंतुसंसर्ग असल्यामुळे काल दि. 3 एप्रिल रोजी खासगी रुग्णालयात अनुमानित रुग्ण म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन. आय. व्ही. पुणे  पाठविण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात नमाज पठण; पोलिसांचा छापा अन्

दिनांक 4.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी
 
1.    एकूण दाखल -     171
2.    जिल्हा शासकीय रुग्णालय-    81
3.    कृष्णा हॉस्पीटल, कराड-    88
4.    खाजगी हॉस्पीटल-    2
5.    कोरोना नमुने घेतलेले-    171
6.    कोरोना बाधित अहवाल -    3
7.    कोरोना अबाधित अहवाल -    164
8.    अहवाल प्रलंबित -    4
9.    डिस्चार्ज दिलेले-    164
10.    सद्यस्थितीत दाखल-    7
11.    आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 3.4.2020) -    644
12.    होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -    644
13.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -    463
14.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती –    181
15.    संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-    58
16.    यापैकी डिस्जार्ज केलेले-    25
17.    यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-    0
18.    अद्याप दाखल -    33

डॉ. हमीद दाभोलकरांनी 'या' साठी घेतलाय पुढाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT